Operation Kaveri : सुदानमधील भारतीयांच्‍या सुटकेसाठी राबवलेल्‍या मोहिमेला ‘ऑपरेशन कावेरी’ नाव का दिले?

 Operation Kaveri : सुदानमधील भारतीयांच्‍या सुटकेसाठी राबवलेल्‍या मोहिमेला ‘ऑपरेशन कावेरी’ नाव का दिले?
Published on
Updated on
पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारने सुदानमधील निर्वासन मोहिमेला 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri ) नाव देण्यात आले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.२५) सांगितले की, संघर्षग्रस्त सुदानमधून अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने 'ऑपरेशन कावेरी' मोहिम राबवली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधून अडकलेल्‍या भारतीयांना मायदेशात परत आणण्‍यासाठी राबवलेल्‍या  ऑपरेशनला 'ऑपरेशन गंगा' असे नाव दिले होते त्याच धर्तीवर सुदानमध्‍ये ऑपरेशन कावेरी नाव देण्यात आले आहे.
सुदानची राजधानी खार्तूम आणि लष्कर प्रमुख अब्देल फताह अल-बुरहान  समर्थक सैन्य आणि शक्तिशाली निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) कमांडर मोहम्मद "हेमेदती" हमदान डगालो यांच्यात लढाई सुरू आहे. सोमवारी (दि.२५) कोची येथे युवाम कॉन्क्लेव्हला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, "सुदानमध्‍ये अडकलेल्‍या भारतीयांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी आम्ही 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरू केले आहे. हे ऑपरेशन केरळचे सुपुत्र आणि आमच्या सरकारमधील मंत्री मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
कावेरी ही कर्नाटक आणि तामिळनाडू या दक्षिणेकडील राज्यांमधून वाहणाऱ्या प्रमुख भारतीय नद्यांपैकी एक आहे. नदी प्रदेशातील लोकांसाठी पवित्र मानली जाते आणि देवी कावर्यम्मा (माता कावेरी) म्हणून पूजली जाते. सुदानमधील निर्वासन मोहिमेला 'ऑपरेशन कावेरी' नाव देण्यात आले याबद्दल सुत्रांनी सांगितले की,  अडथळे असूनही नद्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात. ती आपल्या मुलांना सुखरूप परत आणेल, याची खात्री करून देणाऱ्या आईसारखी असते. म्‍हणूनच सुदानमधील ऑपरेशनला कावेरी असे नाव देण्‍यात आले आहे.

Operation Kaveri : नरेंद्र मोदीजींचे आभार

दरम्यान, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "सुदानमधून अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'चा भाग बनवल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो.

जाणून घ्या यापूर्वीच्या राबवलेल्‍या विविध मोहिमांबद्दल माहिती

१) 'ऑपरेशन गंगा'

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रशियाशी संघर्षाच्या दरम्यान युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आव्हानात्मक भूमिका बजावली होती. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेला 'ऑपरेशन गंगा' असे नाव देण्यात आले होते.

२) 'ऑपरेशन देवी शक्ती'

 अफगाणिस्तानात तालिबानी हल्ल्यावेळी भारत सरकारने सुरू केलेल्या बचाव मोहिमेला 'ऑपरेशन देवी शक्ती' असे नाव देण्यात आले.

३ ) 'ऑपरेशन दोस्त'

या वर्षी भारताने भूकंपग्रस्त तुर्की आणि सीरियामध्ये बचाव आणि मदत सामग्री पाठवली आणि त्याला 'ऑपरेशन दोस्त' असे नाव देण्यात आले होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news