Wrestlers Protest : कुस्तीपटूंचे आंदोलन चिघळले; महावीर फोगाट करणार द्रोणाचार्य पुरस्कार परत!  | पुढारी

Wrestlers Protest : कुस्तीपटूंचे आंदोलन चिघळले; महावीर फोगाट करणार द्रोणाचार्य पुरस्कार परत! 

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या २१ दिवसांपासून कुस्तीपटूंचा आंदोलन सुरू आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन चिघळत आहे. बुधवारी (दि.३) रात्री दिल्ली पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर भाजप नेते आणि कुस्तीपटू बबिता फोगटचे वडील महावीर फोगट  यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आंदोलक कुस्तीपटूंना न्याय न मिळाल्यास द्रोणाचार्य पुरस्कार परत करू.”  दिल्ली पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी  आदोलंकावर हल्ला केला आणि शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांनी सांगितले की त्यांनी केवळ आप नेते सोमनाथ भारती यांना रोखण्याचा प्रयत्न केला जे पूर्व परवानगीशिवाय फोल्डेबल बेडसह घटनास्थळी आले होते. वाचा सविस्तर बातमी. (Wrestlers Protest )

 कुस्तीपट्टू आणि दिल्ली पोलिस यांच्यात वाद

बुधवारी (दि.३) रात्री दिल्ली पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर रात्रीच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal), मंत्री सौरभ भारद्वाज, आमदार कुलदीप आणि इतर काही नेत्यांसह  येथे पोहोचल्या. त्यानंतर तेथे त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. कुस्तीपट्टु विनेश फोगट म्हणाल्या, मला पोलिसांकडून शिवीगाळ झाली, पोलिसांची वागणूक आक्रमक होती. आम्ही बेडची मागणी केली होती.  रात्रीच पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस ड्रिंक करत होते. पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत होता. आपण आपले पदक परत करण्यास तयार असल्याचेही विनेशने सांगितले. पुढे बोलताना फोगट म्हणाली, इतका अपमान केला. काहीही राहिले नाही. सन्मानाची लढाई लढण्यासाठी आले आणि इथे पायदळी तुडवले जात आहेत.

सर्व पदके आणि पुरस्कार भारत सरकारला परत करू : बजरंग पुनिया

जंतरमंतरवर रात्री उशिरा झालेल्या गोंधळानंतर आज सकाळी (४ मे) कुस्तीपटूंनी पत्रकार परिषद घेतली. कुस्तीपटूंनी सांगितले की, त्यांचा लढा सरकार किंवा विरोधकांशी नाही, त्यांचा लढा ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी आहे. पत्रकार परिषदे दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवालही कुस्तीपटूंसोबत उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत बजरंग पुनिया म्हणाले की, जर खेळाडूंचे म्हणणे ऐकून घेता येत नसेल आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर सरकारने त्यांची पदके आणि पुरस्कार परत घ्यावेत. आम्ही आमचे पदक सरकारला परत करू. अशा पदकाचे आपण काय करणार? कुस्तीपटूंना असेच वागवले जाईल, तर पदकांचे काय करणार? त्यापेक्षा आम्ही सामान्य जीवन जगू आणि सर्व पदके आणि पुरस्कार भारत सरकारला परत करू: कुस्तीपटू बजरंग पुनिया जंतरमंतरवर

Wrestlers Protest : चळवळीचे राजकारण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न 

पुनिया म्हणाले की, या आंदोलनाला जाणीवपूर्वक राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे आंदोलन न्यायासाठी असून त्याला सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून आमच्यावर अत्याचार होत आहेत. राजकारण आणि जातीशी जोडून आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Wrestlers Protest : कुस्तीपटू आपल्‍या मागण्‍यांवर ठाम

देशातील अव्वल कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्‍या राजीनाम्‍याची मागणी करत जंतरमंतरवर आंदोलन सुरु केले होते. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर सात महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत, त्‍यांनी कुस्‍तीपटूंचा मानसिक छळ, जीवे मारण्याच्या धमक्या आणि आर्थिक गैरव्यवहार केल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला होता.

हेही वाचा

Back to top button