Wrestler Protest : जंतरमंतरवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना अटक; पोलिसांवर धक्काबुक्कीचा आरोप | पुढारी

Wrestler Protest : जंतरमंतरवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांना अटक; पोलिसांवर धक्काबुक्कीचा आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या २१ दिवसांपासून कुस्तीपटूंचा आंदोलन सुरू आहे. बुधवारी (दि.३) रात्री दिल्ली पोलिस आणि कुस्तीपटूंमध्ये चकमक झाली. त्यानंतर रात्रीच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal), मंत्री सौरभ भारद्वाज, आमदार कुलदीप आणि इतर काही नेत्यांसह  येथे पोहोचल्या. त्यानंतर तेथे त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वाती मालीवाल यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. मद्यधुंद पोलिसांनी त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप पैलवानांनी केला आहे.(Wrestler Protest)

Wrestler Protest : दिल्ली पोलीस ब्रिजभूषण सिंग यांना का अटक करत नाही?

स्वाती मालीवाल पुढे बोलताना म्हणाल्या की, मी महिला कुस्तीपटूंना भेटायला आले होते, हे माझे कर्तव्य आहे. मला समजत नाही आहे की पोलिस मला माझे कर्तव्य बजावण्यात मदत का करत नाहीत. विनेश फोगट, साक्षी मलिक यांनी मला सांगितले की त्यांचा छळ करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी होते जे मद्यधुंद अवस्थेत होते आणि गैरवर्तन करत होते. मला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. ब्रिजभूषण यांना वाचवण्यासाठी दिल्ली पोलीस आणखी काय करणार? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. अद्यापपर्यंत अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यात आलेला नाही. ब्रिजभूषणला अटक करण्याऐवजी दिल्ली पोलीस मुलींची छेड काढत आहेत. दिल्ली पोलीस ब्रिजभूषण यांना का संरक्षण देत आहेत? दिल्ली पोलीस त्याला का अटक करत नाहीत? असे प्रश्न उपस्थित केले. 

हेही वाचा 

Back to top button