वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता | पुढारी

वाशिम जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण 14 जागांसाठी निवडणूक झाली होती, आणि या सर्व जागांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) सर्वाधिक म्हणजेच 5 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडी ची सत्ता आली आहे.

जनविकास आघाडी – 1
अपक्ष – 1
एकूण जागा – 14

जिल्हा परिषदेची 52 सदस्य संख्या आहे. या पोटनिवडणुकीमुळे सद्यस्थितीत झालेलं पक्षीय संख्याबळ खालीलप्रमाणे

भाजप – 7

शिवसेना – 6

काँग्रेस – 11

राष्ट्रवादी – 14

वंचित बहुजन आघाडी – 6

जनविकास – 6

स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1

अपक्ष – 1

या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी

1) शिवसेना – सुरेश मापारी, उकळी पेन गट
2) काँग्रेस – वैभव सरनाईक, कवठा गट
3) काँग्रेस – संध्या ताई देशमुख, काटा गट
4) वंचित – वैशाली लळे, भामदेवी गट
5) वंचित -लक्ष्मी लहाने, पांघरी नवघरे गट
6)राष्ट्रवादी – चंद्रकांत ठाकरे, आसेगाव गट
7) राष्ट्रवादी- अमित खडसे, भर जहागीर गट
8) राष्ट्रवादी – सुनीता कठोळे, कंझरा गट
9) राष्ट्रवादी – राजेश राठोड, दाभा गट
10) राष्ट्रवादी -शोभा गावंडे, तळप गट
11) भाजप – उमेश ठाकरे, कुपटा सर्कल
12) भाजप – सुरेखा चव्हाण, फुल उमरी गट
13) अपक्ष – स्वरस्वती चौधरी, पार्डी गट
14) जनविकास आघाडी – पूजा भुतेकर, गोभणी गट

यापूर्वी गेल्या निवडणुकीतही वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा होत्या. त्यानंतर या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा, काँग्रेसच्या दोन जागा आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 8 जागा मविआकडे आहेत. 14 जागांपैकी 8 जागांवर मविआने विजय मिळवल्याने वाशिम जिल्हा परिषदेवर सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागा रिक्त

वंचित- 4
राष्ट्रवादी काँग्रेस- 3
भाजपा -2
जनविकास आघाडी- 2
काँग्रेस- 1
शिवसेना- 1
अपक्ष 1

या 14 जागा रिक्त झाल्याने वाशिम जिल्हा परिषदेमध्ये सर्व पक्षांचं उरलेले एकूण संख्याबळ खालीलप्रमाणे

राष्ट्रवादी -9
काँग्रेस- 9
शिवसेना- 5
भाजपा- 5
जनविकास आघाडी- 5
वंचित- 4
स्वाभिमानी- 1

हेही वाचलत का?

Back to top button