

लखीमपूर खेरामधील शेतकर्यांची हत्या पूर्वनियोजित कटच होता. हा शेतकर्यांचा अवमान आहे. हे भयकंर आहे. संपूर्ण देशामध्ये हुकूमशाही सुरु असल्याचे चित्र आहे, असा आराेप करत हत्या झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही आहोत. आज मी लखीमपूर खेरी येथे पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ( Rahul Gandhi ) आज पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले, देशात एकीकडे शेतकर्यांची हत्या होत आहे. भाजपच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री व त्यांच्या मुलावर कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही, यावरुनच केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट होते. मागील काही महिने अन्यायकारक कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. आपल्या घटनात्मक हक्कांवर भाजपकडून दबाव येत आहे. देशातील सर्व संस्थांवर केंद्र सरकारचे नियंत्रण आणत आहे. इंधनाचे दर वाढत चालले आहेत. शेतकर्यांवर अन्याय होत आहे. शेतकर्यांवर ठरवून अन्याय केला जात आहे. आम्ही लोकशाही तत्वांसाठी संघर्ष करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी लखनौमध्ये होते; पण ते लखीमपूर खेरीला गेले नाहीत. मी आज लखीमपूरला जातोय. येथे १४४ कलम लागू आहे. पाच लोक एकत्र आले तरच नियमभंग होतो. त्यामुळे मी आणि दोन मुख्यमंत्री हत्या झालेल्या शेतकर्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहाेत. विरोधी पक्षाचे काम दबावचे असते. आम्ही दबाव टाकला तरच कारवाई होते. मात्र विरोधी पक्षांनी कोणताही दबाव टाकू नये, असे केंद्र सरकारचे धोरण आहे, असेही ते म्हणाले.
ही पत्रकार परिषदत केवळ शेतकर्याची उत्तर प्रदेश हत्यासंदर्भात आहे. अन्य कोणतेही प्रश्न विचारु नयेत, असेही राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्ही राजकारण करत आहोत, असे आरोप होत आहे. विरोधी पक्ष हा पीडितांच्या पाठीशी आहे. अन्य पक्षांना परवानगी दिली जात आहे.आम्ही कोणताही कायदा मोडणार नाही. अत्याचार करणारे खुलेआम फिरत आहेत. मग आम्हालाच का अडवले जात आहे, असा सवालही त्यांनी केला.
इंधनाचे दर वाढत चालले आहेत. शेतकर्यांवर अन्याय होत आहे. शेतकर्यांवर ठरवून अन्याय केला जात आहे. आम्ही लोकशाही तत्वांसाठी संघर्ष करत आहोत. सामान्यांच्या पैशाची लूट होत आहे. आम्ही या देशात एकाधिकारशाही चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.