Chandrapur Crime : तब्बल ७ मुलींचा मुख्याध्यापकाकडून विनयभंग | पुढारी

Chandrapur Crime : तब्बल ७ मुलींचा मुख्याध्यापकाकडून विनयभंग

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

Chandrapur Crime : तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबर रोजी वाजली. मात्र बल्लारपूर येथे शाळेचा पहिला दिवस लाजीरवाण्या घटनेने हादरून गेला. बल्लारपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 57 वर्षीय भाऊराव तुमडे याने 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान पुन्हा सात मुलींनी त्या मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाचवीच्या वर्गातील इतर मुलींना बाहेर पाठवून एका मुलीचा विनयभंग केल्यानंतर, पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला असता केम तुकूम येथे तणाव वाढला. पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली.

बल्लारपूर पोलीस तात्काळ शाळेत दाखल होत मुख्याध्यापक तुमडे यांना अटक करीत ठाण्यात नेले. या प्रकारातील सत्यता शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून या घटनेनंतर 1 नाही तब्बल 7 मुलींनी मुख्याध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली.

(Chandrapur Crime) या घटनेत पोलिसांनी मुख्याध्यापक तुमडे यांचेवर कलम 376 (AB), 376 (2) (F), कलम 4, 6, 8 व 12 पोक्सो Pocso अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. संशयित आरोपी मुख्याध्यापक तुमडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर घटना बाल लैंगिक अत्याचाराशी संबंधित असल्याने गुन्ह्याचा तपासाकरिता विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पथकात उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, मपोउपनी नेहा सोलंके, पोक्सो पथकातील व्ही. आर. गायकवाड, गुन्हे शोध पथक प्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

Back to top button