Raju Shetti tweet : लबाड लांडगं ढोंग करतंय ! दिवसा वीजेचं सोंग करतंय !! राजू शेट्टी यांचा पुन्हा सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षावर निशाणा | पुढारी

Raju Shetti tweet : लबाड लांडगं ढोंग करतंय ! दिवसा वीजेचं सोंग करतंय !! राजू शेट्टी यांचा पुन्हा सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षावर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य विधीमंडळाचे शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सभागृहात गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. या दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी (Farmers) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ट्वीट करत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी  पक्षावर “लबाड लांडगं ढोंग करतंय ! दिवसा वीजेच सोंग करतंय !!” असं ट्विट करत निशाणा साधला आहे. (Raju Shetti tweet). वाचा सविस्तर बातमी.

राज्य विधीमंडळ अधिवेशना दरम्यान विरोधी पक्ष राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांच्या समस्या, शेत मालाला मिळणारा कवडीमोल दर, कांदा उत्पादक आदी समस्यांवर विरोधी पक्षाने सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला होता. या दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी (Farmers) संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी “सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतक-यांच्या पाठीत….!” अशा आशयाचं ट्वीट करत काल (दि.२) विरोधी पक्षावर निशाणा साधला होता. (Raju Shetti Tweet) आज त्यांनी पुन्हा, “शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या” या मागणीच्या अनुषंगाने ट्विट करत सत्ताधारी पक्षासह विरोधीपक्षावर निशाणा साधला आहे.

Raju Shetti tweet : वीजेचा करंट कुठे गेला होता? 

राजू  शेट्टी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर लबाड लांडगं ढोंग करतंय! दिवसा वीजेच सोंग करतंय !! असं ट्विट करत एक म्हंटलं आहे की,”महाविकास आघाडी सत्तेत असताना माझ्यासह हजारो शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर १४ दिवस कचरा कुंडाजवळ ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी सत्तेच्या खुचीवर बसलेल्यांना दिवसा वीज देण्याची सदबुद्धी का देवाने दिली नाही, तेव्हा यांच्या दिवसा वीजेचा करंट कुठे गेला होता ? आणि आताचे सत्ताधारी तेव्हा शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या म्हणून सभागृहात आमच्या बाजूने थयथयाट करून सत्ताधारी यांना ४४० चा करंट देत होते. आता मात्र, सत्तेत आल्यावर या प्रश्नाबाबत त्यांचीही फ्यूज उडाली आहे. सत्तेत खुर्ची मिळेपर्यंत विरोधी पक्षच शेतकऱ्यांचा परमनंट सोबती !

हेही वाचा

Back to top button