Gautam Adani: अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची विरोधकांची मागणी अयोग्य; महेश जेठमलानी | पुढारी

Gautam Adani: अदानी प्रकरणाच्या जेपीसी चौकशीची विरोधकांची मागणी अयोग्य; महेश जेठमलानी

नवी दिल्ली:पुढारी वृत्तसेवा: केंद्र सरकारच्या सांगण्यावरुन एलआयसीने अदानी उद्योगसमुहात गुंतवणूक केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप निराधार असून, अदानी (Gautam Adani) प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची त्यांची मागणी देखील अयोग्य आहे, असे भाजपचे खासदार महेश जेठमलानी यांनी शुक्रवारी (दि.०३) पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एलआयसीने अदानीत गुंतवणूक करुन, जर काही चुकीचे केले असेल तर त्याचा तपास करण्याचे काम सेबी आणि आरबीआयचे आहे. जेपीसी चौकशीशी (Gautam Adani) याचा काय संबंध आहे, असे सांगून जेठमलानी पुढे म्हणाले की, अदानी प्रकरणाशी सरकारचा काहीही संबंध नाही. एलआयसी ही स्वतंत्र संस्था आहे. गुंतवणूक करण्याबाबत ते स्वतःहून निर्णय घेत असतात.

अदानी (Gautam Adani) उद्योगसमुहातील विविध कंपन्यांमध्ये एलआयसीची मोठी गुंतवणूक आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानीच्या समभागांची मोठी घसरण सुरु आहे. अदानी उद्योगसमुहातील कंपन्यांचे बाजारमूल्य शंभर अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्तने घसरले आहे. हिंडेनबर्ग ही अमेरिकास्थित शॉर्ट सेलर संस्था असून, अदानी समुहाने आर्थिक आणि अकाउंटिंग घोटाळा केला असल्याचा हिंडेनबर्गचा आरोप आहे. दुसरीकडे हिंडेनबर्गचा अहवाल चुकीच्या तथ्यांवर अवलंबून असल्याचेही अदानी समुहाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button