महाविकास आघाडीमध्ये समन्वय पण सत्यजीत तांबे यांच्या बंडामुळे प्रश्न निर्माण झाला : अजित पवार | पुढारी

महाविकास आघाडीमध्ये समन्वय पण सत्यजीत तांबे यांच्या बंडामुळे प्रश्न निर्माण झाला : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबेची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. तरीही त्यांनी अर्ज न भरल्याने सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्या महाविकासआघाडीची संयुक्त बैठक आहे. नाशिक आणि नागपूर बाबत उद्याच्या बैठकीत निर्णय होईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पवार म्हणाले की, तीन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेतला होता. याचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी तीन जागा तिन्ही पक्षांना द्याव्या असं ठरलेलं होतं. राहिलेल्या नागपूर आणि अमरावतीच्या जागांबाबत पुन्हा एकदा बैठक घेण्याचंही ठरलं होतं. जेव्हा फॉर्म भरण्याची वेळ आली तेव्हा डॉ. तांबेनी अर्ज न भरल्याने सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत मला आधीच कुणकुण लागली होती. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती दिली होती. यामुळे भाजपला संधी मिळाली आहे. नाशिक आणि नागपूर जागेबाबत उद्याच्या बैठकीत निर्णय होईल, असे पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या
Back to top button