अॅलन मस्क आता राजकारणात येणार?  | पुढारी

अॅलन मस्क आता राजकारणात येणार? 

वॉशिंग्टन : ट्विटर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक अॅलन मस्क यांनी आता राजकारणात रस दाखवला आहे. आपण राजकारणात यावे, की राहू नये, याबाबत ट्विटरवर एका पोलच्या माध्यमातून यूजर्सचे मत जाणून घेतले. एका राजकीय नेत्याला पाठिंब्याचे ट्विट मस्क यांनी केले होते. त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. नंतर मस्क यांनी एक पोल घेतला आणि यात, राजकारणापासून लांब राहावे की राजकारणात पडून स्वतःचे नुकसान करून घ्यावे, असा प्रश्न यूजर्सना केला. मस्क यांनी स्वत:चे नुकसान करून घ्यावे, या मताला अधिक पसंती मिळाली, हे विशेष!

Back to top button