Delhi MCD Election : दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी 4 डिसेंबरला मतदान 7 डिसेंबरला निकाल | पुढारी

Delhi MCD Election : दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी 4 डिसेंबरला मतदान 7 डिसेंबरला निकाल

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi MCD Election : राष्ट्रीय राजधानी दिल्ली महापालिका निवडणूक कार्यक्रमा जाहीर झाला आहे. दिल्ली राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. एमसीडी निवडणुकीसाठी 4 डिसेंबरला मतदान होईल तर 7 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Delhi MCD Election : दिल्ली राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. निवडणूक आयुक्त डॉ. विजय देव यांनी म्हटले आहे की 7 नोव्हेंबरला नोटिफिकेशन जारी करण्यात येईल. तर निवडणुकांसाठी 14 तारखेपर्यंत नामांकन करण्याची मूदत राहील.

Delhi MCD Election : दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 250 वॉर्ड निर्धारित केले आहे. त्यापैकी 42 वॉर्ड एससी साठी राखीव करण्यात आले आहे. तर महिलांसाठी 50 टक्के जागा आरक्षित आहेत. तर एससीसाठी राखीव 42 जागांमध्ये 21 सीट एससी महिलांसाठी आरक्षित आहे. तर अन्य 104 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.

Delhi MCD Election : तर 1 जानेवारी 2022 पर्यंत 1,46,73,847 मतदार आहेत. निवडणुकीसाठी EVM वरच वोटिंग होईल असे त्यांनी स्पष्ट केले. मॉडल कोड ऑफ कंडक्ट आजपासूनच लागू झाले आहे. तसेच रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाउड स्पीकर वर बंदी असेल. उमेदवार जास्तीत जास्त खर्च अधिकतम 5.75 लाख ते 8 लाख रुपयापर्यंत खर्च करू शकतो.

हे ही वाचा :

Brutal Murders In Delhi : तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; दाम्पत्यासह मोलकरणीची हत्या

Air In Delhi : दिल्लीतील हवा जीवघेणी; तर नोएडातील गंभीर श्रेणीत

Back to top button