Brutal Murders In Delhi : तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; दाम्पत्यासह मोलकरणीची हत्या

Brutal Murders In Delhi : तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली; दाम्पत्यासह मोलकरणीची हत्या
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मंगळवारी सकाळी घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने (Brutal Murders In Delhi) राजधानी दिल्ली हादरली. दिल्लीतील हरी नगरमधील अशोक नगर भागात अज्ञातांनी घरात घुसून पती-पत्नीसह मोलकरणीची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेसंदर्भात सखोल चौकशी करण्यात येत आहे. समीर आहुजा त्यांची पत्नी शालू आहुजा आणि मोलकरीण सपना अशी मृतांची नावे आहेत.

चार मजली इमारतीमध्ये हे दाम्पत्य आणि त्यांची २ वर्षांची मुलगी घरामध्ये राहत होते. ही घटना घडली तेव्हा मुलगी झोपली होती. सकाळी साडेसात वाजता घरातील मोलकरीण सपना ही नेहमीप्रमाणे घरात आली, मात्र त्यानंतर तिची सुद्धा घरातच हत्या करण्यात आली. मृत दाम्पत्याची दोन वर्षांची मुलगी घरात सुखरूप सापडली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊनक तपासास गती दिली आहे. (Brutal Murders In Delhi)

तपास पथकांची स्थापना (Brutal Murders In Delhi)

याप्रकरणी डीसीपी घनश्याम बन्सल यांनी माहिती दिली आहे की, पोलिसांना सकाळी 9.15 च्या सुमारास चोरीची घटना असल्याचा फोन आला होता. पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा पोलिसांना तीन मृतदेह घरात आढळले, ज्यामध्ये 2 महिला आहेत. त्यापैकी एक समीर आहुजा आणि त्याची पत्नी शालू आहे, तर तिसरा मृतदेह मोलकरीण सपनाचा आहे. आजूबाजूच्या सर्व खोल्यांची झडती घेण्यात आली आहे. या हत्येच्या तपासाकरीता पोलिसांच्या अनेक पथके तयार करण्यात आहेत. लवकरात लवकर पोलिस आरोपींचा शोध करण्यात यशस्वी ठरतील.

मारेकऱ्यांनी मुलीला जिवंत सोडले

डीसीपी बन्सल म्हणाले की, घटनेचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहांवर धारदार तसेच जड शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. मोलकरीण आल्यानंतर ही घटना घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. मात्र दाम्पत्याचे मूल सुखरूप आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news