ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांचे पारडे जड | पुढारी

ब्रिटिश पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांचे पारडे जड

पुढारी ऑनलाईन: ब्रिटनच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान लिझ ट्रस पक्षाच्या दबावाखाली झुकल्या आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला. आता ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्याकडे पाहिले जात आहे. पक्षाचा पुढील नेता निवडीपर्यंत ट्रसच पंतप्रधान म्हणून कार्यरत राहतील.

कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या अधिकृत सूत्रांच्या माहितीनुार, ब्रिटनचा नवा पंतप्रधान २८ ऑक्टोबरला निवडला जाईल. पक्षाकडून नवीन नेता म्हणून कोणाची निवड केली जाणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. पंतप्रधानपदासाठी सुनक प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button