Rishi Sunak : ‘या’ कारणामुळे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधान पदाला मुकणार?

Rishi Sunak : ‘या’ कारणामुळे ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधान पदाला मुकणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक ऋषी सुनक हे सध्या ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहेत. दरम्यान, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यासाठी मतदानाची अंतिम फेरी बाकी आहे, ज्यामध्ये पंतप्रधानांची निवड केली जाईल. ऋषी सुनक हे भारतीय तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्स (लोकसभा) मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. पण आता हीच 'श्रीमंती' त्यांच्या पंतप्रधान पदाच्या मार्गात अडथळा ठरू शकते.

ब्रिटनचे राजकीय विश्लेशक प्रोफेसर मॅट गुडविन यांच्या म्हणणण्या प्रमाणे, ऋषी यांची संपत्ती त्यांना पंतप्रधान कार्यालयापासून दूर ठेवू शकते. सुनक यांच्याकडे इतका पैसा आहे, की ज्यामुळे ते ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत आहेत. ऋषी यांची वैयक्तिक संपत्ती हा निवडणुकीत मोठा मुद्दा बनणार आहे. कारण एकीकडे जिथे ऋषी इतके श्रीमंत आहेत, तर दुसरीकडे देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या संकटाला तोंड देत आहे', असे त्यांनी मत मांडले आहे.

सुनक मार्ग खडतर…

प्रेफेसर मॅट पुढे म्हणाले, 'प्रामाणिकपणे सांगायचे तर मला वाटत नाही की त्यांच्यासाठी पंतप्रधान होणे इतके सोपे आहे. मला वाटते की या शर्यतीत संपत्तीचा मुद्दा आहे. हे फक्त श्रीमंत होण्याबद्दल नाही. मी श्रीमंत होण्याच्या विरोधात नाही. पण ऋषी सुनक यांचे प्रकरण वेगळे आहे. ते राणी एलिजाबेथ यांच्यापेक्षा दुप्पट श्रीमंत आहेत. आम्हाला जगण्याच्या संकटाचा सामना करावा लागत आहे आणि येणा-या काही महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होईल. हा एक महत्त्वाचा एक मुद्दा असेल.'

ऋषी हे पक्षासाठीही मोठा धोका आहेत…

ऋषी सुनक हे पक्षासाठी मोठा धोका आहेत. समजा हे सर्व मुद्दे नसले तरी आणि सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांच्यात कोण जिंकेल? सवाल उपस्थित करत प्रेफेसर मॅट यांनी ऋषी सुनक यांनी अर्थमंत्री असताना ब्रिटनची आर्थिक परिस्थिती न हाताळल्यामुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचे म्हटले.

ब्रिटेन के अगले प्रधानमंत्री की दौड़ में ऋषि सुनक और लिज ट्रस के बीच सोमवार को लाइव डिबेट होगी. यही डिबेट इनके पीएम बनने का फैसला करेगी. इसके बाद पोस्टल बैलेट पर वोटिंग होगी. इससे पहले ऋषि सुनक ने शनिवार को कहा,' इसमें कोई शक नहीं, मैं ब्रिटेन की पीएम की दौड़ में अंडरडॉग (दूसरों से कमजोर और हारने की आशंका वाला व्यक्ति) हूं.

दरम्यान, पूर्व इंग्लंडमधील ग्रँथम येथे रेडी फॉर सेज मोहिमेत भाषण देताना ऋषी सुनक यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, सदस्यांना पर्याय हवा आहे आणि ते माझे ऐकण्यास तयार आहेत. मी सर्वांच्या पसंतीचा उमेदवार नव्हतो, पण आता दोन पर्याय (उमेदवार) शिल्लक आहेत आणि त्यात माझा समावेश आहे. जनतेला जगण्याच्या खर्चाचे सत्य सांगावे लागेल. वाढती महागाई शत्रूसारखी आहे, ज्यामुळे लोक गरीब होतात. वाढत्या महागाईला आळा घालणे हाच खरा बदल आहे आणि मी ती कमी करण्याची शपथ घेतो', असा विश्वास त्यांनी दिला.

शेवटच्या टप्प्यात ट्रस यांच्याकडून मात

यूगव (YouGov)ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात, लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांच्यावर 28 मतांची आघाडी आहे. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांनी गुरुवारी सुनक आणि ट्रस यांना पक्षाच्या नेतृत्वाच्या अंतिम टप्प्यात पाठवण्यासाठी मतदान केले.

सर्वेक्षणात ट्रस यांच्या विजयाचा दावा

या आठवड्याच्या सुरुवातीचा डेटा दर्शवितो की 46 वर्षीय ट्रस सुनक यांना 19 गुणांनी मात देतील. ट्रस यांनी भक्कम आघाडी कायम ठेवली आहे. बुधवारी आणि गुरुवारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 730 खासदारांचे सर्वेक्षण करण्यात आले. सहभागी 62 टक्के लोकांनी सांगितले की ते ट्रस यांना मतदान करतील तर 38 टक्के लोकांनी सुनक यांना निवडले. कंझर्वेटिव्ह सदस्यांची सध्याची संख्या अद्याप ज्ञात नाही, परंतु 2019 च्या निवडणुकीत सुमारे 160,000 सदस्य होते. आता त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार ट्रस यांनी सुनक यांना प्रत्येक श्रेणीत मागे टाकले आहे. त्यांनी महिला आणि पुरुष दोघांचाही विश्वास जिंकला आहे. ब्रेग्जिटच्या बाजूने मतदान करणा-यांनी ट्रस यांना साथ दिली आहे.

2016 मध्ये ब्रेक्झिट (युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे)साठी मतदान करणाऱ्यांनी ट्रस यांना पाठिंबा दिला आहे. सुनक हे फक्त एकाच आघाडीवर ट्रस यांना पिछाडीवर टाकण्यात यशस्वी झाले आहेत आणि ती म्हणजे 2016 ची ब्रेक्झिट मोहीम.

आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या पाचही फेऱ्यांमध्ये सुनक हे आघाडीवर होते. पाचव्या फेरीत त्यांना 137 मते मिळाली तर ट्रस यांना 113 मते मिळाली पण सर्व्हेनुसार त्यांना आता पक्षात कमी दर्जाचे मानले जात आहे.

4 ऑगस्टपासून मतदानाला सुरुवात होणार

यूके-आधारित मार्केट रिसर्च आणि डेटा अॅनालिटिक्स कंपनी YouGov च्या सर्वेक्षणानुसार, सुनक आणि ट्रस यांच्यापैकी एकाची पुढील पंतप्रधान म्हणून निवड केली जाईल.नुतन पंतप्रधान म्हणून या दोन्ही उमेदवारांपैकी एकाची निवड करण्यासाठी 4 ऑगस्ट ते सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत मतदान होणार आहे. ब्रिटनच्या पुढील पंतप्रधानाची निवड 5 सप्टेंबर रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news