Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांनी घेतली अमित शहा यांची भेट | पुढारी

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांनी घेतली अमित शहा यांची भेट

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण फ्रान्स येथील मार्सिलिस बंदरावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे निवेदन विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्याकडे केली. नार्थ ब्लॉकमध्ये त्यांनी  शहा यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केल्याची माहिती भेटीनंतर नार्वेकरांनी दिली. (Rahul Narvekar )
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीशांच्या ताब्यातून सुटका करून देशासाठी स्वातंत्र्य लढा सुरू ठेवण्यासाठी दक्षिण फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरामध्ये बोटीतून उडी घेतली होती. या ऐतिहासिक घटनेला यावर्षी ११२ वर्ष पूर्ण होत आहेत. इतिहासामध्ये या घटनेला  अनन्यसाधारण महत्व आहे. या ठ‍िकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक असावे, अशी भारतीयांची अपेक्षा आहे. या स्मारकाच्या संकल्पनेबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा ही पाठिंबा असल्याची माहिती नार्वेकर यांनी यावेळी दिली. (Rahul Narvekar)
याविषयावर परराष्ट्र व्यवहार मंत्री यांची भेट घेतली असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून योग्य समन्वय आणि सहकार्य व्हावे, यासाठी ही बैठक होती. यासंदर्भात पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.
हेही वाचा

Back to top button