पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ब्लड बँकेत रक्त विकण्यासाठी पोहचली. याबाबत चौकशी केली असता या मुलीने अनेक विसंगत कारणे सांगितली. याशिवाय आपल्या आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचेही कारण तिने यावेळी सांगितले. शेवटी तिने ९००० रूपयांच्या स्मार्टफोनची ऑर्डर दिली आहे. त्याचे पैसे देण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यात ही अल्पवयीन मुलगी रक्त विकण्यासाठी रुग्णालयात पोहचली होती.
दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या अल्पवयीन मुलीची समजूत काढून आई-वडिलांकडे सोपवले. हे प्रकरण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी या मुलीला चाईल्ड लाईन इंडियाला सोपवले. चाईल्ड लाईन इंडिया हे एक सरकारी संगठण आहे आणि ते संकटकाळी लहानग्यांची मदत करण्यास सक्रिय असते.
मुलीने रक्ताच्या बदल्यात पैशांची मागणी केली, तेव्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती एनजीओला दिली. ब्लड बँकेचे कर्मचाऱ्यांना अल्पवयीन मुलीने स्मार्टफोन खरेदी करण्याचे कारण सांगितल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. याबाबत चाईल्डलाईनच्या रिता महतो म्हणाल्या की, कोणीतरी या अल्पवयीन मुलीला सांगितले असेल की, जर तू रक्त विकलेस तर मोबाईल विकत घेता येईल. आम्ही तिला बालकल्याण समितीकडे पाठवणार आहोत.