पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना; कोकणातील विमान उड्डाणाची तारीख बदलली | पुढारी

पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना; कोकणातील विमान उड्डाणाची तारीख बदलली

सिंधुदुर्ग, पुढारी ऑनलाईन: सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून विमान उड्डाणाची शिवसेनेने जाहीर केलेली तारीख नारायण राणे यांनी बदलल्याने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

या विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाहीर केली. ९ ऑक्टोंबर, २०२१ रोजी या विमानतळाचे उद्घाटन ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ७ ऑक्टोंबरला विमानतळावरून विमान उड्डाण होणार असल्याची माहिती दिली होती. त्यात आता राणे यांनी नवी तारीख जाहीर करून राजकारण तापवले आहे.

९ ऑक्टोंबर पासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. गेली सात वर्षे विमानतळ बांधून तयार होते.

मात्र, तेथून उड्डाण झाले नव्हते. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना या विमानतळाचा फायदा होईल, असेही राणे म्हणाले.

‘९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता नागरी विमान उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येणार आहेत. तेथून ते सिंधुदुर्गला जातील.

राणे यांनी सिंधिया यांची वेळ घेतली असून उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

हॉट अमृता खानविलकर हिचे लाल इश्क (photo viral)

विजेचा शॉक लागून दोन चुलत भावंडांचा मृत्यू

‘मुख्यमंत्री पाहिजेतच असे नाही’

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राणे यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली.

त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे अशी राजकीय लढाई रस्त्यावर झाली. त्यामुळे पुन्हा एकदा कटुता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवणार का?, असा प्रश्न राणे यांना पत्रकारांनी केला असता ‘मुख्यमंत्री पाहीजेत असं नाही’, असे ते म्हणाले.

‘ हा क्रेडीट घेण्याचा प्रश्न नाही. मी २०१४ पर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केले. मी स्थानिक नाही का? आम्ही स्थानिक असल्याने आणि विमानतळ बांधल्याने आमचा अधिकार आहे.

पर्यटन जिल्हा आम्ही जाहीर केला. कुणी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना कोणत्या आधारावर बोलते हे माहिती नाही. मी संबंधित मंत्र्यांशी याबाबत बोललो आहे,’ असेही ते म्हणाले.

शिवसेनेनेही केली होती घोषणा

शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी विमानतळावरून विमानाचं उड्डाण ७ ऑक्टोबरपासून होणार आहे, अशी घोषणा केली होती. सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अडीच हजारात सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी दिली होती. त्यामुळे राणे यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी नव्या तारखेची घोषणा करत राजकीय वातावरण तापवले आहे.

हेही वाचा: 

Back to top button