हॉट अमृता खानविलकर हिचे लाल इश्क (photo viral) | पुढारी

हॉट अमृता खानविलकर हिचे लाल इश्क (photo viral)

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : सिनेसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू करणारी आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी आपले हॉट फोटो ( Photo) आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या अमृता खानविलकर हिने लेटेस्ट फोटोशूट करत हटके लूक व्हायरल केला आहे.

अमृता खानविलकरने नुकतेच इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोत अमृताचा हटके आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला.

या फोटोत अमृताने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यात तिने कोणतेही कॅप्शन लिहिले नाही. परंतु, #aboutlastnight असे हॅशटॅग दिला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच खूपच चाहत्यांना आवडले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून अनेक कॉमेन्टस केला आहेत.

यात एका नेटकऱ्याने ‘क्यूट’, ‘सुंदर’, ‘ग्लॅमरस’ तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिला ‘लाल इश्क’ अशी हटके कॅप्शन दिली आहे. याशिवाय या फोटोसोबत चाहत्यांनी प्रेमाचा, आगीचा ईमोजी देखील शेअर केले आहेत.

अमृताच्या इन्स्टाग्रामवर तिचे हटके आणि स्टायलिश फोटोंनी ( Photo ) धुमाकूळ घातला आहे. तिच्या प्रत्येक लूक चाहत्यांना भारावून सोडतो. यातील खास म्हणजे, अमृताचा मराठीमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

याआधी अमृता खानविलकर हिने ब्लॅक रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट ( Photo ) केले होते. यावेळी तिच्यावर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं होतं. याशिवाय अमृताने ‘वेल डन बेबी’ या मराठी चित्रपटात काम केलं होतं.

हेही वाचलंत का? 

Back to top button