Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला ‘या’ हॉलीवूड अभिनेत्याचा पाठिंबा | पुढारी

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला 'या' हॉलीवूड अभिनेत्याचा पाठिंबा

पुढारी ऑनलाईन: काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या खूप चर्चेत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेचे (Bharat Jodo Yatra) नेतृत्व करत आहेत. हॉलिवूडचा अभिनेता जॉन क्युसॅकने देखील आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आपला पाठिंबा दिला आहे. यापूर्वी त्याने भारतातील शेतकरी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यालाही पाठिंबा दर्शवला होता.

अभिनेता जॉन क्युसॅक यांने शनिवारी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या समर्थनार्थ ट्विट करत या यात्रेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “भारतीय संसद सदस्य राहुल गांधी काश्मीर ते केरळ प्रवास (Bharat Jodo Yatra) करत आहेत”. त्यानंतर एका ट्विटर युजर्सने राहुल यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानले, तेव्हा जॉन क्युसॅकने “होय – एकता, प्रत्येक ठिकाणच्या फॅसिस्टालादीयांसाठी!” असे उत्तर दिले आहे.

कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंतची ही यात्रा 3,500 किमीची असून, ‘भारत जोडो यात्रा’ हे अंतर 150 दिवसांत पूर्ण करणार आहे. ही यात्रा या कालावधीत 12 राज्यांमधून जाणार आहे. केरळमधून जात असलेली ही यात्रा 30 सप्टेंबरला कर्नाटकात पोहोचणार आहे. ही यात्रा उत्तरेकडे जाण्यापूर्वी 21 दिवस कर्नाटकात(Bharat Jodo Yatra) असणार आहे. ही पदयात्रा दररोज 25 किमी अंतर कापणार आहे.

एका बाजूला काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवडप्रक्रिया सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा. राहुल गांधी यांनी “गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य यापुढे पक्षाचा अध्यक्ष होणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर, पक्षात नव्या अध्यक्षपदासाठीच्या निवड प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड १७ ऑक्टोबरला होणार असून, १९ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी आगामी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोण आहे जॉन क्युसॅक

जॉन क्युसॅक हा एक प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता आहे. ज्याने ‘सेरेंडिपिटी’, ‘कॉन एअर’, ‘2012’ आणि ‘हाय फिडेलिटी’ सारख्या हॉलीवूड चित्रपटांमधील त्याच्या कामासाठी तो ओळखला जातो. तो सोशल मीडियावर जागतिक मुद्द्यांवर जोरदार बोलणारा म्हणूनही ओळखला जातो.

हे ही वाचा:

Back to top button