Congress Bharat Jodo Yatra : “द्वेषाच्या राजकारणामुळे मी माझे वडील गमावले… ” राहुल गांधीचं ट्विट | पुढारी

Congress Bharat Jodo Yatra : "द्वेषाच्या राजकारणामुळे मी माझे वडील गमावले... " राहुल गांधीचं ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेसच्‍या भारत जोडो यात्रेला (Congress Bharat Jodo Yatra)  आजपासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली प्रारंभ होत आहे. तत्‍पूर्वी राहूल गांधी (Rahul Gandhi) यांनी राजीव गांधी मेमोरियल येथे जावून आपले वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन केले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. राहूल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “द्वेषाच्या राजकारणामुळे मी माझे वडील गमावले. अशा द्वेषाच्या राजकारणामूळे मी माझ्या प्रिय देशालाही गमावू शकत नाही. प्रेम द्वेषाचा पराभव करेल. आशा आहे, भीतीचा पराभव करेल. एकत्रितपणे आपण यावर मात करू.”

Congress Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा

गेले काही दिवस चर्चेत असणारी भारत जोडो यात्रेचा आजपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा  देशातील बारा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. दररोज सुमारे २१ किलोमीटरचा पायी प्रवास केला जाणार आहे. कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा १५० दिवसात ३ हजार ५७० चा पायी प्रवास करेल. काश्मिरमध्ये तिचा समाराेप हाेईल.

हेही वाचलंत का?

Back to top button