सुप्रिया ताई तुम्ही तुमचे सरकार असताना बाहेर पडत नव्हता आता या सरकारची काळजी करु नका; चंद्रकांत पाटील | पुढारी

सुप्रिया ताई तुम्ही तुमचे सरकार असताना बाहेर पडत नव्हता आता या सरकारची काळजी करु नका; चंद्रकांत पाटील

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : दोन-दोन मुख्यमंत्री हवेत म्हणजे एका मुख्यमंत्र्याला फिरायला अधिक वाव मिळेल आणि दुसरे मुख्यमंत्री प्रशासन सांभाळतील, असा टोमणा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला होता. मात्र त्यांच्या या टोल्याला उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. ते म्‍हणाले,  तुमचे सरकार असताना सुप्रिया ताई तुम्ही तर बाहेर पण पडत नव्हता, आता या प्रशासनाचा कारभार अतिशय व्यवस्थित सुरू आहे. हे मुख्यमंत्री सरकार पण चालवतात आणि दौरे देखील करत आहेत, असा टोला लगावला.

कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या परिसरातील किर्तनकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी भाजपचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, माजी आमदार नरेंद्र पवार आणि जीवनदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षणासोबत स्कील डेव्हलमेंटवर भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना फंड देऊ. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गरज पाहता त्या भागाला लॉ कॉलेज दिले आहे. ग्रामीण भागात आर्टस, सायन्स, बीएस्सीचे शिक्षण घेऊन काय होणार नाही. ती एक समाजाची छोटी गरज आहे. या विषयांचे ज्ञान आणि त्याला स्कील डेव्हलमेटंची जोड दिल्यास एका बाजूने तरुण बुद्धीमान होईल तर दुस:या बाजूने त्याला रोजगार मिळेल, असा विश्वास  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा   

कोल्हापूर : पाटगांव मौनी सागर जलाशय १००% भरले

शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय: राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ सुरु करणार 

कृषी क्षेत्रात विकासासाठी शेतक-यांनी सरकारच्या भरवश्यावर राहू नये : नितीन गडकरी

Back to top button