मुंबई : कोरोनाचा सहा महिन्यांतील निच्चांक, २४१७ जणांचा मृत्यू | पुढारी

मुंबई : कोरोनाचा सहा महिन्यांतील निच्चांक, २४१७ जणांचा मृत्यू

मुंबई ; अजय गोरड : राज्यात दुसर्‍या लाटेनंतर मागील सहा महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात 1 लाख 58 हजार 830 रुग्ण आढळून आले, तर 2, 417 मृत्यूंची नोंद झाली आहे.

फेब्रुवारी महिन्यानंतर प्रथमच दैनंदिन रुग्णसंख्या सरासरी 5 हजारांपर्यंत खाली आली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 50 हजारांच्या घरात आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात असल्याचे आकडेवारी सांगते.

17 जिल्ह्यांत केवळ 506 सक्रिय रुग्ण

राज्यातील निम्म्या म्हणजेच 17 जिल्ह्यांत 31 ऑगस्ट रोजी केवळ 506 इतके सक्रिय रुग्ण आहेत. यात विदर्भातील, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे. गोंदिया 2, नंदुरबार 3, वर्धा 5, भंडारा 7, वाशिम 8, यवतमाळ 8, जालना 17, अकोला 17, धुळे 22, नांदेड 27, गडचिरोली 32, परभणी 38, बुलढाणा 44, जळगाव 49, हिंगोली 59, नागपूर 70, आणि अमरावती 95 आदी 17 जिल्ह्यांत केवळ 506 सक्रिय रुग्ण आहेत. निम्मा महाराष्ट्र कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यांत 70 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. यात सर्वाधिक पुण्यात 13 हजार 515 (27 टक्के) रुग्ण, ठाण्यात 7 हजार 81 (14 टक्के) रुग्ण, सातार्‍यात 5 हजार 602 (11 टक्के) रुग्ण, अहमदनगरमध्ये 5 हजार 441 (10 टक्के) रुग्ण तर सांगलीत 4 हजार 260 (8 टक्के) रुग्ण असे एकूण 70 टक्के रुग्ण सक्रिय आहेत.

सोलापूरमध्ये 3 हजार 737 (7 टक्के), मुंबई मध्ये 3 हजार 469 (6 टक्के), कोल्हापूरात 1 हजार 397 (3 टक्के), रत्नागिरी 1 हजार 45 (2.0), सिंधुदुर्ग 977 (2 टक्के) असे 5 जिल्ह्यांत 20 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. याचाच अर्थ केवळ 10 जिल्ह्यांत राज्यातील 90 टक्के सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. या 10 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी दर 6 ते 3 टक्केपर्यंत आहे.

Back to top button