Funeral and Family : अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंब ‘रमले’ हास्‍यात..! केरळच्या मंत्र्यांनी केला ‘तो’ फाेटाे शेअर | पुढारी

Funeral and Family : अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंब 'रमले' हास्‍यात..! केरळच्या मंत्र्यांनी केला 'तो' फाेटाे शेअर

पुढारी ऑनलाईन: केरळमधील एका कुटुंबातील सदस्‍याचा मृत्‍यू झाला. पार्थिवावर अंत्यसंस्कारापूर्वी  फोटो काढण्यात आला.  या फोटोत जवळपास कुटूंबातील ४० सदस्य दिसत आहेत. हा फाेटाे सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल होत आहे. ( Funeral and Family )  कारण शवपेटीच्या बाजूला कुटुंबातील सदस्य उभे आणि काही बसलेले दिसत असून, ते हसताना दिसत आहेत. केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा फाेटा शेअर करत त्‍याचे समर्थन केले आहे.

स्‍थानिक माध्‍यमांनी दिलेल्‍या माहितीनुसार, हा फोटो पठानथिट्टा जिल्ह्यातील मालापल्ली गावातील एका कुटुंबाचा आहे. या कुटुंबातील ९५ वर्षीय मरियम्मा यांचे १७ ऑगस्ट राेजी निधन झाले. मरियम्मा वर्षभरापासून अंथरूणाला खिळून होत्या.  गेल्या आठवड्यात त्यांची तब्येत खूपच बिघडली. मरियम्मा यांच्‍या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांची आठवण म्हणून एक कौटुंबिक फोटो घेण्यात आला. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्‍यांच्‍या चेहऱ्यावर हसू दिसत आहे.

Funeral and Family : फोटो जतन करावा हाच कुटूंबाचा हेतू

मरियम्मा यांना ९ मुले आणि १९ नातवंडे आहेत, जी वेगवेगळ्या ठिकाणी असतात. परंतु, त्या दिवशी बहुतेक सर्वजण घरीच होते.  कुटुंबातील सदस्‍य बाबू उम्मन यांनी सांगितले की,  “हा फोटो व्हायरल करण्याचा कुटूंबाचा कोणताही हेतू नव्‍हता. मरियम्मा या ९५ वर्षे आनंदाने जगल्या. त्‍यांचे मुलांवर आणि नातवंडांवर खूप प्रेम होते. मरियम्मा यांचा फोटो काढल्यानंतर तो जतन करावा, हाच कुटूंबाचा हेतू होता; पण हा फोटो व्हायरल झाला आणि काही नेटकऱ्यांनी या फोटोवर निगेटीव्ह कमेंट केल्या.”

 शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी केले फाेटाेचे समर्थन

जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे. आपण सहसा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या कुटूंबाला रडतानाच पाहतो. मृत्यू हा वियोग दुःखद क्षण आहे. पण तो निरोपाचा देखील क्षण आहे. वयोवृद्ध मृत व्यक्तीला स्मायली निरोप देण्यापेक्षा आनंद काय असू शकतो? असे मत व्यक्त करत केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या फोटोचे समर्थन केले आहे.

अनेकांना हा फाेटाे स्‍वीकारता आलेला नाही. अनेकांना मृत्यूनंतर देखील फक्त दु:ख आणि अश्रूच दिसतात.  मृत्यूवर दु:ख, शोक व्यक्त करण्यापेक्षा मृत व्यक्तीला आनंदाने निरोप द्यावा, या कुटुंबानेही तेच केले आहे, अशा शब्‍दात त्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिले आहे.

हेही वाचा : 

Back to top button