प. बंगाल शिक्षकभरती घोटाळा: अबब! अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडले आणखी 50 कोटी! | पुढारी

प. बंगाल शिक्षकभरती घोटाळा: अबब! अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडले आणखी 50 कोटी!

पुढारी ऑनलाइन डेस्क: बंगालमध्ये शिक्षकभरती घोटाळाप्रकरणी कारवाई सुरू असून आज टाकलेल्या छाप्यात अर्पिता मुखर्जी यांच्या दुस-या घरातही आणखी 50 कोटी रुपये सापडले आहेत. त्यामुळे आणखी किती रुपयांचे घबाड दडवून ठेवले आहे. हा प्रश्न समोर येत आहे.

शिक्षक भरती घोटाळा! पश्चिम बंगालच्या माजी शिक्षणमंत्र्याला अटक, ‘ईडी’च्या छाप्यात २० कोटींचे घबाड सापडले

यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने पश्चिम बंगालचे माजी शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांना कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. शिक्षक भरती घोटाळ्याच्या (SSC recruitment scam) संदर्भात ईडीचे पथक सातत्याने चौकशी करत आहेत. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी छापा घातला होता.

छाप्यादरम्यान चॅटर्जी यांच्या घरातून ईडीने 20 कोटी नंतर पुन्हा 27 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यात आज आणखी 50 कोटींची भर पडली आहे. चटर्जी यांनी हे पैसे शिक्षक भरती घोटाळ्यातून मिळवले आहेत, असा संशय ईडीला आहे. अपश्चिम बंगाल शालेय सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण बोर्डातील भरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. मंत्री चटर्जी यांच्यासह शिक्षण राज्यमंत्री परेश अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते.

हे ही वाचा :

शिक्षक भरती घोटाळा : पार्थ चटर्जींची मंत्रीपदावरुन हकालपट्टी

शिक्षक भरती घोटाळा : अर्पिताकडे 20 कोटी, मोनालिसाकडे 10 फ्लॅट

शिक्षक भरती महाघोटाळा : अभिनेत्री अर्पिताच्‍या फ्‍लॅटमधून आणखी २७ कोटींची रोकड, ४ कोटींचे सोने जप्‍त

Back to top button