शिक्षक भरती महाघोटाळा : अभिनेत्री अर्पिताच्‍या फ्‍लॅटमधून आणखी २७ कोटींची रोकड, ४ कोटींचे सोने जप्‍त

शिक्षक भरती महाघोटाळा : अभिनेत्री अर्पिताच्‍या फ्‍लॅटमधून आणखी २७ कोटींची रोकड, ४ कोटींचे सोने जप्‍त
Published on
Updated on

कोलकाता : पुढारी ऑनलाईन : पश्‍चिम बंगालमधील बहुचर्चित एसएससी शिक्षक भरती घोटाळ्यात दररोज धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सक्‍तवसुली संचालनालयाने ( ईडी ) धडक कारवाई करत माजी शिक्षण मंत्री व संसदीय कार्य मंत्री पार्थ चटर्जी यांच्‍या निकटवर्ती अभिनेत्री अर्पिता मुखर्जी यांच्‍या आणखी एका फ्‍लॅटवर बुधवारी छापा टाकला. या प्‍लॅटमध्‍ये तब्‍बल २७ कोटी रुपयांची रोकड आणि ४  कोटी रुपयांचे सोने जप्‍त करण्‍यात आले आहे. या घोटाळाप्रकरणी 'ईडी'ने आतापर्यंत अर्पिता चटर्जी यांच्‍या निवासस्‍थानांमधून तब्‍बल ५३.२२ कोटी रुपयांचे घबाड मिळाले आहे.

यापूर्वीच्‍या छाप्‍यात २१ कोटींची रोकड जप्‍त

पश्‍चिम बंगालचे विद्यमान व्यापार व वाणिज्यमंत्री पार्थ चटर्जी हे यापूर्वी राज्याचे शिक्षणमंत्री असताना घडलेल्या शिक्षक भरती घोटाळ्यातील मनी लाँडरिंग प्रकरणात 'ईडी'ने बुधवारी धडक कारवाई केली. मंत्री चटर्जी तसेच त्यांची निकटवर्तीय अभिनेत्री अर्पिता मुखर्जीच्या 5 ठिकाणांवर छापेमारी केली होती. यावेळी २१ कोटींची रोकड जप्‍त करण्‍यात आली होती. यानंतर 'ईडी'ने मंत्री चटर्जी व अर्पिता या दोघांना अटक केली होती.

अर्पिता यांच्‍या आईलाही संपत्ती पाहून धक्‍का

अर्पिता मुखर्जी यांच्‍याकडील संपत्तीने सर्वांनाच धक्‍का बसला आहे. त्‍यांच्‍या आई मिनती मुखर्जी यांनीही आपल्‍या मुलीकडे एवढी संपत्ती होती याची माहितीच नसल्‍याचे सांगत आहेत. अर्पिताकडे सापडलेले रोकड व सोने पाहून आपल्‍यालाही धक्‍का बसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटलं आहे. दरम्‍यान, या प्रकरणी  पार्थ चटर्जी यांचे खासगी सचिव सुकांत आचार्य यांनाही चौकशीला हजर राहण्‍याचे आदेश ईडीने दिले आहेत.

१०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्‍याचा 'ईडी'चा संशय

पश्‍चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा हा १०० कोटी रुपयांचा असल्‍याचा संशय 'ईडी'ने व्‍यक्‍त केला आहे. बुधवारी ( दि. २७) सकाळी 'ईडी'च्‍या पथकांनी अर्पिताच्‍या चार फ्‍लॅटवर छापे टाकले. बेलघरिया येथील फ्‍लॅटचे कुलूप तोडत धडक कारवाई केली. यावेळी या फ्‍लॅटमध्‍ये तब्‍बल २१ कोटी रुपयांची रोकड मिळाली होती. ही राेकड माेजण्‍याचे मशीनवर काम सुरु असतानाच आणखी २७ काेटी रुपये आणि ४ काेटींचे रुपयांचे साेन्‍याचे दागिने मिळाल्‍याने ईडीचे अधिकारीही आवाक झाले आहेत. याप्रकरणी पार्थ आणि अर्पिता या दोघांचीही ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे.

पार्थ चटर्जींबाबत आज कॅबिनेट बैठकीत फैसला

पार्थ चटर्जी यांच्या अटकेला 5 दिवस उलटले आहेत. पक्षातील महासचिव पद, उद्योग, माहिती-तंत्रज्ञान आणि व्यापार-वाणिज्यमंत्रिपदी मात्र ते अद्याप कायम आहेत. भाजपने त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. गुरुवारी राज्याची कॅबिनेट बैठक होणार असून, या बैठकीत चटर्जींशी संबंधित निर्णय शक्य आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news