बंदिस्त हवेतील कोरोनाचे विषाणू नष्ट करणारे प्लगइन यंत्र तयार | पुढारी

बंदिस्त हवेतील कोरोनाचे विषाणू नष्ट करणारे प्लगइन यंत्र तयार

दिनेश गुप्ता

पुणे : कोरोना व्हायरसवर मात करणारे ’एरोस्कॅन प्लगइन’ नावाचे छोटे यंत्र पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कने तयार केले आहे. हे यंत्र प्लगइन मॉस्किटो मशीनप्रमाणेच घरात, कारमध्ये वापरता येऊ शकते. त्यामुळे घर आणि कार सॅनिटाईज करण्याची सोय अगदी सहजपणे उपलब्ध झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या विज्ञान व तंत्रज्ञान पार्कच्या संशोधकांनी या अत्याधुनिक यंत्राचे संशोधन केले आहे. कोरोनाची चौथी लाट जूनमध्ये पुन्हा सक्रिय झाली असून, आणखी किती लाटा येतील, याचा अंदाज नाही. त्यामुळे बंदिस्त खोली व चारचाकी वाहनांतील कोरोना विषाणू नष्ट व्हावेत, या उद्देशाने

हे ’प्लगइन एरोस्कॅन’ यंत्र विकसित करण्यावर येथील संशोधकांनी प्रयत्न केले. कोरोना विषाणू आल्यावर येथील संशोधकांनी एक मोठे यंत्र विकसित केले होते. ते मोठे असल्याने हाताळणे अवघड जात होते. त्यावर मात करीत नवे संशोधन करण्यात आले आहे.

Corona : भारत-द. आफ्रिका टी २० मालिकेत कोरोनाची एन्ट्री, ‘हा’ खेळाडू पॉझिटीव्ह

बंदिस्त खोलीत सर्वाधिक विषाणूचा धोका

कोरोनाचे विषाणू गर्दीत गेल्याने वाढतात व त्यांचा प्रसार होतो. हे खरे असले तरी, बंदिस्त खोली, वातानुकूलित दुकाने, क्लिनिक, घरे, मॉल, चित्रपटगृह या ठिकाणच्या बंदिस्त हवेत पॅथोजन्स, अलर्जंस व इतर प्रकारचे प्रदूषित घटक तयार होतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार मोकळ्या हवेपेक्षा बंदिस्त हवेत जास्त होतो. त्यासाठी हे यंत्र अतिशय उपयुक्त व क्रांतिकारी ठरले आहे.

आयोनायझेशन तंत्रज्ञानाने तयार केले मशीन

हे मशीन आयोनायझेशन तंत्रज्ञान वापरून अतिशय सोप्या पद्धतीने तयार करण्यात आले असून, ते स्विच ऑन करताच बंदिस्त रूम व कारमधील विषाणू नष्ट होतात. या यंत्रातून बाहेर पडणारे निगेटिव्ह आयन्स, घराच्या भिंती, कोपरे, अडगळीच्या जागादेखील सॅनिटाईज करतात; तसेच घरात कुठे बुरशी तयार होत असेल, तर तीदेखील नष्ट करते. याबरोबर सल्फेट व नायट्रेटचे विविध ऑक्साईड्सदेखील या यंत्रामुळे नाहीसे होतात. ज्यामुळे घरात झालेले प्रदूषण नाहीसे होते.

चंद्रपूर : हात उसणे घेतलेल्या पैशाच्या कारणावरून तरुणाला दगड बांधून विहिरीत ढकलले

सायन्स टेक्नॉलॉजी पार्कच्या संशोधकांनी या यंत्राचे अत्याधुनिक मॉडेल तयार केले आहे. त्याला स्विच एरोस्कॅन असे नाव दिले आहे. यात ट्रॅव्हलर व प्लगइन असे दोन प्रकार आहेत. 500 चौरस मीटर इतका भाग हे यंत्र सॅनिटाईज करते.

-डॉ. राजेंद्र जगदाळे, संचालक सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क, पुणे.

हेही वाचा 

चंद्रपूर : हात उसणे घेतलेल्या पैशाच्या कारणावरून तरुणाला दगड बांधून विहिरीत ढकलले

बीड : अवैध वाळू माफियांच्या ट्रॅक्टरने घेतला आणखी एक बळी

नाशिक : संसरी येथे वीज पडून महिला ठार

Back to top button