चंद्रपूर : हात उसणे घेतलेल्या पैशाच्या कारणावरून तरुणाला दगड बांधून विहिरीत ढकलले | पुढारी

चंद्रपूर : हात उसणे घेतलेल्या पैशाच्या कारणावरून तरुणाला दगड बांधून विहिरीत ढकलले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : पैसे हातऊसणे घेतल्याच्या कारणावरून उदभलेल्या भांडणात दोघा आरोपींनी एका मित्राला जबरमारहाण करून दगड बांधून विहिरीत ढकलून हत्याची केल्याची क्रूर धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चंद्रपूर जवळील हाकेच्या अंतरावरील मोरवा या गावात ही घटना उघडकीस आली. गुरूवारी ( दि.9) मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. प्रवीण घिवे असे मृताचे नाव आहे. या धक्कादायक घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. पडोली पोलिसांनी या हत्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली आहे.

पोलिस सुत्रानुसार, चंद्रपूर तालुक्यातील मोरवा गावातील प्रवीण घिवे हा तरूणाने गावातील काही मित्रांकडून हातऊसणे पैसे घेतले होते. सदर पैसे परत करण्याच्या कारणावरून गावातील युवकांनी त्याचासोबत वाद घातला. वाद टोकाला पोहचल्याने मित्रांनी त्याला जबर मारहाण केली. ते मित्र एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी गावातील एका विहीरीत प्रवीणच्या कंबरेला दगड बांधून विहिरीत ढकलले. सदर घटना ही मंगळवारी (दि.७) घडली. दगड कंबरलेला बांधून विहिरीत ढकलल्याने त्याचा विहिरीतील पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. सदर विहिरीत कुणाचारी मृतदेह असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढण्यासाठी योजना आखली. त्यानुसार दगड बांधलेला मृतदेह तीन दिवसांनी गुरूवारी बाहेर काढण्यात आला.

मृतदेहावरून हत्या करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृत युवकाला दगड बांधून ढकलून देत हत्या केल्याचे प्रकरण वाटल्याने त्यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तत्काळ पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या प्रकरणचा उलगडा केला. या हत्या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यात एका अल्पवयीनक आरोपींचा समावेश आहे.

Back to top button