Corona : भारत-द. आफ्रिका टी २० मालिकेत कोरोनाची एन्ट्री, ‘हा’ खेळाडू पॉझिटीव्ह | पुढारी

Corona : भारत-द. आफ्रिका टी २० मालिकेत कोरोनाची एन्ट्री, ‘हा’ खेळाडू पॉझिटीव्ह

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind Vs Sa) यांच्यात दिल्लीत पहिला T20 सामना खेळला जात आहे. दरम्यान, आफ्रिकन कॅम्पमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्कराम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्याची COVID-19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मात्र, दोन्ही देशांमधील पहिल्या सामन्यावर याचा परिणाम झाला नाही आणि दिल्लीत खेळ सुरूच राहिला.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सामन्यापूर्वी कोरोना चाचणीच्या शेवटच्या फेरीत एडन मार्कराम कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

एडन मार्करामची प्रकृती ठीक असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मार्कराम वगळता उर्वरित संघातील खेळाडूंची कोविड चाचणी निगेटीव्ह आली आले. त्यामुळे दिल्ली टी-20 सामन्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.

इंडियन प्रीमियर लीग-2022 संपल्यानंतर लगेचच ही मालिका होत आहे. भारताचे अनेक स्टार खेळाडू आयपीएलनंतर आपापल्या घरी गेले आणि नंतर मालिकेसाठी एकत्र आले. तर दक्षिण आफ्रिकेचे जे खेळाडू आयपीएल खेळत होते ते भारतातच राहिले.

Back to top button