नाशिक : संसरी येथे वीज पडून महिला ठार | पुढारी

नाशिक : संसरी येथे वीज पडून महिला ठार

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील संसरी येथे वीज पडून सविता बाळासाहेब गोडसे (वय ४५ ) या महिलेचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि. ९) सायकाळी सदर घटना घडली.

सांयकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सदर महिला जनावरांना चारा घेऊन मळ्यातून घरी परतत होती. यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यांचा मागे काही अंतरावर असलेली मुलगी यातून बचावली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी सदर महिलेस कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचलंत का?

Back to top button