राधिका मर्चंट होणार अंबानी कुटुंबाची सून | पुढारी

राधिका मर्चंट होणार अंबानी कुटुंबाची सून

मुंबई ; पुढारी ऑनलाईन  
असलेले मुंबई शहर गेल्या काही काळात थबकून गेेले होते. तथापि, नुकत्याच झालेल्या भरनाट्यम अदाकारीने हे शहर पुन्हा जणू जिवंत झाले आहे. राधिका मर्चंट यांनी हा अरंगेत्रम कार्यक्रम सादर केला. त्याची शहरात मोठी चर्चा झाली. राधिका या उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांची होणारी पत्नी आहेत.

बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे सर्व प्रोटोकॉल पाळले गेले. राधिका मर्चंट यांचा परफॉर्मन्स सुरेख झाला. राधिका यांनी भावना ठकार यांच्याकडे 8 वर्षे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले आहे. आणि हा त्यांचा पहिलाच स्वतंत्र कार्यक्रम होता. यानिमित्ताने भरतनाट्यम या पारंपरिक नृत्य प्रकारात आणि त्याच्या गुरू-शिष्य परंपरेत एका नव्या कलाकाराचाही प्रवेश झाला आहे.

विशेष म्हणजे, भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतलेल्या राधिका या अंबानी कुटंबातील दुसर्‍या व्यक्‍ती आहेत. नीता अंबानीदेखील प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जबाबदार्‍या सांभाळत त्यादेखील परफॉर्मन्स करत असतात. राधिकांच्या परफॉर्मन्समध्ये पुष्पांजलीने सुरुवात ते गणेशवंदना, पारंपरिक अलारीपू प्रार्थना आदीनंतर सुप्रसिद्ध भजन अच्युतम केशवम, त्यात शबरी आणि रामाची गोष्ट, कृष्णाचे गोपिकांसमवेत नृत्य, बालकृष्ण आणि यशोदा यांच्या गोष्टी होत्या. त्यानंतर भगवान नटराज यांचे नृत्य, नवरसांचे सादरीकरण असा कार्यक्रम झाला.

पाहा व्हिडिओ :

शशांक प्रतापवार यांना मिम्स बनवून पैसे मिळतात का? Shashan Pratapwar Memes

 

 

 

 

Back to top button