राज्यात लहान मुलांमधील कोविड चे प्रमाण अधिकच | पुढारी

राज्यात लहान मुलांमधील कोविड चे प्रमाण अधिकच

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पहिल्या लाटेत मुलांना कोविड ची बाधा होण्याचे प्रमाण कमी असले तरी दुसर्‍या लाटेत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. राज्यातील 0 ते 10 वयोगटातील तब्बल 2 लाख मुलांना कोविड ची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

राज्यातील 1 ऑगस्टपर्यंत 0 ते 10 या वयोगटातील 2 लाख 305 एवढ्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, 18 दिवसांत तब्बल 5 हजार नव्या बाधितांची नोंद झाली असल्याचे वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अहवालातुन समोर आले आहे.

वैद्यकीय विक्षण व औषधी द्रव्ये विभागाने काढलेल्या तीन अहवालात जवळपास 18 दिवसांत 5 हजार 196 नव्या बाधितांची झाली आहे.

14 जुलैच्या पहिल्या अहवालात 1 लाख 95 हजार 109 लहान मुलांची नोंद झाली तर 28 जुलै या दिवशी 1 लाख 99 हजार 281 वर पोहोचली. आणि हीच संख्या 1 ऑगस्ट रोजी तब्बल 2 लाखांच्या पुढे गेली.

राज्यात 0 ते 10 वयोगटातील लहान मुलांचे 1 टक्क्यांपेक्षा कमी मुलांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका हा लहान मुलांना जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कारण दुसरी लाट ओसरू लागली असली तरी लहान मुले कोरोना बाधित होण्याचा आलेख चढाच असल्याचे दिसून येते.

Back to top button