महाराष्ट्र अनलॉक : पुणे, कोल्हापूर, सांगली सातारसह ११ जिल्हे तिसऱ्या टप्प्यातच! | पुढारी

महाराष्ट्र अनलॉक : पुणे, कोल्हापूर, सांगली सातारसह ११ जिल्हे तिसऱ्या टप्प्यातच!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र अनलॉक : कोरोना निर्बंधामध्ये कोल्हापूर, सांगली सातारसह ११ जिल्हे तिसऱ्या टप्प्यातच राहणार आहेत. यामध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाही. उर्वरित जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे.

वरील ११ जिल्ह्यांमधीस सर्वांधिक पॉझिटिव्ह केसेसचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. वर नमूद केलेल जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता येणार आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होतील.

निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यांमध्ये आता सर्व दुकाने रात्री८ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने वगळता इतर दुकाने रविवारी बंद राहतील.

ब्रेक द चेन अन्वये काय आहे नियमावली? पाहा खालील लिंकवर

ORDER-Break the Chain-Modified Guidelines 02.08.2021

Back to top button