आजचे राशीभविष्य (दि. ३ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशीभविष्य (दि. ३ ऑगस्ट २०२१)

पं. प्रसाद जोशी

मेष– चंगळवादावर नियंत्रण आवश्यक आहे, दुसर्‍यावर विसंबून राहू नका, आपले काम चोख करा.
वृषभ– आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. स्वभावामुळे लोक आपलेसे होतील, प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
मिथुन– अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, कर्ज प्रकरणांत अडचणी येतील, संयम ठेवणे गरजेचे आहे.
कर्क– जवळच्या लोकांचे सहकार्य लाभेल, प्रगतीचा मार्ग मिळेल, नियोजनामुळे यशाकडे वाटचाल कराल.
सिंह– वरिष्ठांची मर्जी राखाल, विश्‍वास संपादन कराल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
कन्या– ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, आत्मविश्‍वास दृढ ठेवा.
तूळ– उष्णतेचे विकार उद्भवतील, आहारावर नियंत्रण आवश्यक आहे, वादविवादापासून दूर राहा.
वृश्‍चिक– प्रलंबित कामे पूर्ण होतील, कामांना गती मिळेल, जोडीदाराची साथ लाभेल.
धनु– लोकप्रियता मिळेल, चांगल्या कामामुळे पदोन्‍नती होण्याची शक्यता, नवे मित्र होतील.
मकर– परावलंबी स्वभावामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे, संतुलन साधणे महत्त्वाचे आहे.
कुंभ– कौटुंबिक जबाबदारी वाढेल, व्यावहारिक सावधानता बाळगा, आत्मचिंतनाची गरज आहे.
मीन– संवादाने प्रश्‍न सुटतील, वादविवादात यश मिळेल, आप्‍तस्वकीयांचे सहकार्य लाभेल.

Back to top button