सोलापुरात क्रेनने एकाला उडवले, एकाचा जागीच मृत्यू | पुढारी

 सोलापुरात क्रेनने एकाला उडवले, एकाचा जागीच मृत्यू


सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पायी चालत जाणाऱ्या एकाचा क्रेनने जोराची धडक दिल्याने जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. ही घटना सोलापूर शहरातील मरिआई चौकाकडून डोणगाव रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी रात्री (११ एप्रिल) आठच्या सुमारास घडली.

अविनाश गजेंद्र बोबडे (वय ५७) राहणार जुनी लक्ष्मी चाळ, डोणगाव रोड असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी रात्री मयत अविनाश बोबडे हे मरीआई चौकाकडून पायी चालत जुनी लक्ष्मी चाळ येथील मधल्या वाटेने जात होते. त्यावेळेस समोरुन वेगाने येणाऱ्या MH१३ सी एस १२३७  क्रेनने पायी चालणाऱ्या बोबडे यांना जोराची धडक दिली. या धडकेत बोबडे उडून बाजूला पडले, अपघात झाल्याचे समजताच क्रेन चालक क्रेन सोडून पळून गेला.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जखमी बोबडे यांना रिक्षात घालून उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. जोपर्यंत क्रेन चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली असता पोलिसांनी तातडीने चालकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button