CBSE Term 2 परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या अधिक | पुढारी

CBSE Term 2 परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे? जाणून घ्या अधिक

पुढारी ऑनलाईन डेस्क

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education) २६ एप्रिलपासून CBSE च्या १० वी आणि १२ वी साठी टर्म २ परीक्षेचे (CBSE Term 2) ऑफलाइन पद्धतीने आयोजन करत आहे. या परीक्षेच्या आधी, CBSE लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र (admit card) जारी करणार आहे.

टर्म १ परीक्षेदरम्यान दिलेला रोल नंबर टर्म २ साठीदेखील समान असणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आता CBSE लवकरच टर्म २ परीक्षांसाठी नवीन हॉल तिकीट जारी करणार आहे. admit card नेमकं कधी जारी करणार याची तारीख अद्याप बोर्डाने जाहीर केलेली नाही. पण परीक्षेबाबत अपडेट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर लक्ष ठेवायला हवे. एकदा admit card जारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी CBSE वेबसाइटवरून त्यांचे admit card डाउनलोड करणे आवश्यक आहे. केवळ वेबसाइटवरूनच नाही तर विद्यार्थ्यांना त्यांचे admit card त्यांच्या शाळांमधूनदेखील उपलब्ध होतील.

CBSE Term 2 साठी admit card कसे डाउनलोड करावे…

cbse.gov.in अधिकृत वेबसाइटवर जा

होमपेजवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि Class 10/Class 12 Term 2 admit card निवडा

तुम्हाला एक नवीन वेबपेज दिसेल

यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा

नंतर स्क्रीनवर admit card दिसेल, ते डाउनलोड करा

Back to top button