

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट म्हणजेच, UGC NEET 2022 या परीक्षेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) त्यांच्या nta.ac.in आणि neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये १७ जुलै रोजी यूजीसी २०२२ ची नीट (NEET) परीक्षा होणार असल्याचे सांगितले आहे.
भारतात पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET प्रवेश परीक्षा घेतली जाते. वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असणारे तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला बसतात. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) या परीक्षेसाठी वयोमर्यादा हटवल्यानंतर, यावेळी चाचणीसाठी अर्जदारांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.
यूजीकडून घेण्यात येणारी नीट (NEET) परीक्षा १७ जुलै (रविवार) रोजी दुपारी २ ते ५.३० या वेळेत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२ पर्यंत असणार आहे. अघाप प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर झालेली नाही.
यूजीकडून नीट (NEET) परीक्षा २०२२ चे आयोजन ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही परीक्षा एकूण १६ भारतीय भाषांमध्ये घेतली जाणार असल्याचे यूजीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत सांगितले आहे.