'परीक्षा पे चर्चा ' : तुम्ही केलेल्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा, पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला | पुढारी

'परीक्षा पे चर्चा ' : तुम्ही केलेल्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा, पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी देशातील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात संवाद साधत आहेत. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम सुरु आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. देशातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एप्रिलमध्ये विविध सण आहेत, पण याच महिन्यात परीक्षासुद्धा असतात. त्यामुळे परीक्षेविषयी नेहमीच भीती वाटत असते. याआधी तुम्ही अनेक परीक्षा दिल्या आहेत. पण तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या तयारीवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा.

वाचन करताना कधी कधी एकाग्र नसते, मन दुसरीकडेच असते. पण अभ्यास करताना मन एकाग्र करायला शिका, असाही सल्ला पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. माध्यम ऑनलाईन असो की, ऑफलाईन अभ्यास महत्वाचा आहे. माध्यम बदलण्याचा अभ्यासावर कोणताही परिणाम होत नाही. ऑनलाईन माध्यमातून अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. मात्र ते आपलेल्या पार पाडायचे असतात. अनुभवातूनच आपण शिकत जातो. असेही पंतप्रधान मोदींनी म्हणाले.

संजय राऊत म्हणतात, केंद्रीय तपास यंत्रणा आता फक्त पाकिट मारांवर कारवाई करायची बाकी

शैक्षणिक धोरणाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, 2021 पासूनच शैक्षणिक धोरण करण्याचे काम सुरू आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे अनेक फायदे होतील. नव्या शैक्षणिक धोरणात सर्व आवश्यक घटकांचा समावेश आहे. काळानुसार व्यवस्थेत बदल व्हायलाच हवा. जर आपले मन एकाग्र असेल तर माध्यम बदलाचा परिणाम होत नाही. त्यामुळे ऑनलाईचाही आपल्यावर काही परिणाम होत नाही. स्वतःला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. स्वत:ला जाणून घेताना, कोणत्या गोष्टी तुम्हाला निराश करतात, त्या बाजूला ठेवा. मग तुम्हाला कळेल की, कोणत्या गोष्टी तुम्हाला नैसर्गिकरित्या प्रेरित करतात. तुम्ही तुमच्या स्वतःविषयीचे विश्लेषण स्वतः केले पाहिजे, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

पंतप्रधानांचा पालकांना सल्ला

मी पालकांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमची स्वप्ने, जी तुम्ही पूर्ण करू शकत नाही. ती तुमच्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. ही बाब आपल्या मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने मुक्तपणे घडू द्या.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, टीव्ही चॅनेल, यूट्यूबच्या विविध वाहिन्यांवरून सुरु आहे. परीक्षेवरील चर्चेदरम्यान, मुले, त्यांचे पालक आणि शिक्षक त्यांचे प्रश्न पंतप्रधान मोदींना विचारू शकतात.

हेही वाचलत का ?

Back to top button