deepika padukone : दीपिकाच्या हॉट फोटोंनी चाहत्यांवर केली जादू | पुढारी

deepika padukone : दीपिकाच्या हॉट फोटोंनी चाहत्यांवर केली जादू

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्रामवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील दीपिकाच्या हॉट अंदाजाने चाहत्यांवर जादू केली आहे. या फोटोमध्ये दीपिका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या हॉट आणि गॅमरस लूकने दीपिका सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी तिला भरभरून कमेंट केल्या आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण अनेक बॉलिवूड स्टार्सपैकी एक आहे. एका मासिकासाठी तिने नुकतेच फोटो शूट केले आहे. दीपिका नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते, त्यामुळे तिला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. दीपिका पदुकोणने एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी फोटो शूट केले आहे. या फोटोंमध्ये दीपिकाच्या वेगवेगळ्या स्टाइल्स पाहायला मिळत आहेत आणि चाहत्यांना ते खूपच आवडलेत. या मासिकाच्या पृष्टभागावरही तिचा ग्लॅमरस फोटो दिसत आहे. या फोटोंवर नेटीझन्सनीही प्रतिक्रीया दिल्या आहेत.

दीपिकाचा इन्स्टा स्वॅग

दीपिका पदुकोणचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दीपिका कधी देसी तर कधी बोल्ड लूकमध्ये तिचे फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर दीपिका कित्येक वर्षांपासून सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहे. काही दिवसांपूर्वी दीपिकाने तिच्या सर्व इन्स्टापोस्ट संग्रहित केल्या होत्या. इंस्टावर तिने १८१ पोस्ट केल्या आहेत. दीपिकाचे सध्या ६५ दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि ती १६७ लोकांना फॉलो करते.

दीपिकाचे आगामी चित्रपट

दीपिका पदुकोणचा ‘गेहराईं’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला, काहींना खूप आवडला, तर काहींनी नकार दिला. दीपिका पदुकोण हृतिक रोशन सोबत ‘फायटर’, अमिताभ बच्चन सोबत ‘द इंटर्न’, शाहरुख खान आणि जॉन अब्राहम सोबत ‘पठाण’ या आगामी चित्रपटांमध्येही दीपिका दिसणार आहे.

 

Back to top button