कणकवली : नाटळ मल्हारी नदीवरील पूल कोसळला, १० गावांचा संपर्क तुटला | पुढारी

कणकवली : नाटळ मल्हारी नदीवरील पूल कोसळला, १० गावांचा संपर्क तुटला

कणकवली; पुढारी वृत्तसेवा : कणकवली : नरडवे या प्रमुख जिल्हा मार्गावरील नाटळ मल्हार नदीवरील सुमारे 57 वर्षांपूर्वीचा जुना पूल कोसळला. आज (ता.२२) दुपारच्या सुमारास एक दगडी पिलर दबून कोसळला.

सुदैवाने ही दिवसा घटना घडल्याने मोठी जीवितहानी टळली. पूल कोसळल्याने नरडवे, नाटळ, दिगवळे, दारिसेसह सुमारे दहा गावांचा संपर्क तुटला आहे.

सन १९६४ साली हा पूल दगडी पिलरवर बांधण्यात आला होता. या मार्गावर नियमित वाहतुकीबरोबरच अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते.

पंधरा दिवसांपूर्वी या पुलाच्या एका बाजूकडील एक दगडी पिलर ढासळला होता. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे दुरुस्ती करता आली नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील अवजड वाहतुक बंद केली होती. तसेच फलकही लावला होता. गुरुवार सकाळपासून झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदीला महापूर आला आहे.

त्यात तो पुलाचा ढासळलेला पीलर तीन ते चार फूट खाली दबला आणि पूल कोसळला.

सुदैवाने त्यावेळी वाहतूक नव्हती. पूल कोसळल्याने आता त्या दहा गावातील वाहतुक ठप्प झाली आहे, त्याना शिवडाव मार्गे सुमारे 15 ते 20 किमीचा फेरा मारून कनेडी व कणकवलीमध्ये यावे लागणार आहे.

भुईंबावडा घाटमार्गातून सुरु असलेली अवजड वाहतूक गुरुवारपासून बंद

भुईंबावडा घाटमार्गातून सुरु असलेली अवजड वाहतूक गुरुवारपासून बंद करण्यात आली आहे. सध्या करुळ घाटमार्ग बंद असल्यामुळे भुईबावडा घाटमार्गातून वाहातूक सुरु होती.

अवजड वाहतुकीमुळे भुईबावडा ते वैभववाडी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचत चालला आहे.

घाटातही रस्ता खचलेला असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेताला आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button