King Charles III : ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचे निदान | पुढारी

King Charles III : ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचे निदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे (King Charles III) यांना कर्करोगाचे निदान झाल्याचे बकिंगहॅम पॅलेसने म्हटले आहे. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर सोमवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बकिंगहॅम पॅलेसने सोमवारी ही माहिती दिली.

बकिंघम पॅलेसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७५ वर्षीय राजा चार्ल्स यांना वाढलेल्या प्रोस्टेटच्या उपचारादरम्यान कर्करोग झाल्याचे निदान झाले. किंग चार्ल्स यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे आणि शरीराच्या कोणत्या भागात आहे याचा उल्लेख या निवेदनात करण्यात आलेला नाही. राजा चार्ल्स यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नसून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. (King Charles III)

राजघराण्याच्या प्रवक्त्याने सांगितले की, किंग चार्ल्स पूर्णपणे सकारात्मक आहेत आणि लवकरच त्यांची शाही कर्तव्ये पुन्हा सुरू करतील. मात्र, त्यांच्या आजारातून बरे होण्यासाठी किती वेळ लागेल याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. आजारपणामुळे ते काही काळ राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या जागी कुटुंबातील इतर ज्येष्ठ सदस्य सामील होतील. या काळात ते कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे आणि राजवाड्यात छोट्या खासगी बैठका घेणे सुरू ठेवतील. २०२२ मध्ये दुसऱ्या राणी एलिझाबेथच्या मृत्यूनंतर, चार्ल्स तिसरे ब्रिटनचे राजे झाले आहेत. (King Charles)

हेही वाचा : 

Back to top button