इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, पत्नीसह सात वर्षांची शिक्षा | पुढारी

इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का, पत्नीसह सात वर्षांची शिक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्‍या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील चार दिवसांत त्‍यांना तोशाखान आणि सिफर प्रकरणी शिक्षा झाली होती. आता पकिस्‍तानातील न्‍यायालयाने गैर-इस्लामिक विवाह प्रकरणात इम्रान खान आणि त्‍यांच्‍या पत्‍नी बुशरा खान यांना सात वर्षांची शिक्षेसह दंडही ठोठावला आहे. (Pakistan ex-PM Imran Khan, wife get 7 years for unlawful marriage)

71 वर्षीय इम्रान खान यांच्याविरुद्ध या आठवड्यातील हा न्‍यायालयाचा तिसरा निकाल होता. तुरुंगात असलेल्या इम्रान खानला नुकतीच गोपनीयतेचा भंग केल्याबद्दल (सिफर प्रकरण) दहा वर्षे आणि तोशाखाना प्रकरणात त्याच्या पत्नीसह 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पंतप्रधान पदाची शपथ घेण्‍याच्‍या सात महिने आधी म्‍हणजे जानेवारी २०१८ मध्‍ये इम्रान खान यांनी बुशरा यांच्‍यासोबत एका गुप्त समारंभात ‘निकाह’ केला होता, परंतु त्यांचा निकाह अचानक चर्चेचा विषय बनला होता’रॉयटर्स’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, गैर-इस्लामिक विवाह प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा यांना 5 लाख रुपये ($1,800) दंड ठोठावण्यात आला आहे. सध्‍या इम्रान खान रावळपिंडीच्या गॅरिसन सिटी कारागृहात आहेत.

Back to top button