Israel-Palestine War : युद्धाचा तेरावा दिवस, आत्तापर्यंत ४ हजार पॅलेस्टानी ठार | पुढारी

Israel-Palestine War : युद्धाचा तेरावा दिवस, आत्तापर्यंत ४ हजार पॅलेस्टानी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षाला सुरुवात होऊन तेरा दिवस उलटली आहेत. युद्धात आत्तापर्यंत इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गाझामधील मृतांची संख्या ४ हजारच्या पुढे गेली आहे, अशी अधिकृत माहिती पॅलेस्टाईनकडून देण्यात आली आहे. (Israel-Palestine War)

७ ऑक्टोबर पासून हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अजून सुरुच आहे. त्यामुळे गाझामधील मधील मृतांची संख्या ४१३७ इतकी झाली आहे. शिवाय, गाझामध्ये १३ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. यानंतर इस्रायलकडून गाझा येथे बॉम्बहल्ले करण्यात आले आहेत. (Israel-Palestine War)

इस्रायलकडून अपहरण झालेल्यांचा तपशील जाहिर (Israel-Palestine War)

इस्रायली सैन्याने हमासकडून अपहरण करण्यात आलेल्या गाझामधील लोकांचा तपशील जाहिर केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने सध्या गाझा पट्टीमध्ये अपहरण करण्यात आलेले २०० लोक असल्याचे म्हटले आहे. याबाबत त्यांनी अधिक तपशील दिला आहे. २०० पैकी २० पेक्षा जास्त १८ वर्षांखालील मुले आहेत. शिवाय ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्यांची संख्या १०-२० दरम्यान आहे. अपहरण करण्यात आलेले बहुतांश लोक जीवंत आहेत. (Israel-Palestine War)

हेही वाचंलत का

Back to top button