Anti-Palestine Tweet : पॅलेस्टाईन विरोधी पोस्ट भोवली; भारतीय वंशाच्या डॉक्टरला कामावरुन काढले | पुढारी

Anti-Palestine Tweet : पॅलेस्टाईन विरोधी पोस्ट भोवली; भारतीय वंशाच्या डॉक्टरला कामावरुन काढले

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका भारतीय वंशाच्या डॉक्टरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पॅलेस्टाईन विरोधात पोस्ट केली होती. दरम्यान, रॉयल बहरीन हॉस्पिलटलने पॅलेस्टाईन विरोधात पोस्ट केल्याने भारतीय वंशाच्या डॉक्टरला कामावरुन काढून टाकले आहे. डॉ, सुनिल राव असे या डॉक्टरचे नाव आहे. डॉक्टरांनी ट्वीटरवर इस्रायला आपला पाठिंबा दर्शवला. शिवाय, हमासमुळेच गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे, असेही म्हटले होते. (Anti-Palestine Tweet)

हमासच्या हल्लानंतर इस्रायलनेही जोरदार प्रत्युत्तर दिले. इस्रायलच्या हल्लात गाझामधील ३ हजार लोकांचा मृत्यू झाला. अशावेळीच डॉक्टरने ही पोस्ट केल्यामुळे कारवाईला सामोरे जावे लागले आहे. रॉयल बहरीन हॉस्पिटलने याबाबत म्हटले की, “डॉ. सुनिल राव हे औषधांचे विशेषज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांनी आपल्या समाजाबाबत आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. डॉक्टरांनी आमच्या आचारसंहितेचे उल्लंघन केलय. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहोत. त्यांची सेवा तात्काळ संपुष्टात आणण्यात आली आहे.” (Anti-Palestine Tweet)

डॉ. सुनिल राव यांचा माफीनामा (Anti-Palestine Tweet)

डॉ. सुनिल राव यांनी आपली पोस्ट असंवेदनशील असल्याची कबुली दिली आहे. शिवाय त्यांनी माफीनामाही जाहिर केला आहे. डॉ. राव म्हणाले, मी ट्वीटरवर केलेल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सध्या जे घडत आहे त्यासंदर्भाने ते अतिशय असंवेदनशील होते. मी या देशाच्या लोकांचा आणि धर्माचा मनापासून आदर करतो. कारण मी येथे आलो आहे. गेली १० वर्षे येथे राहत आहे. (Anti-Palestine Tweet)

हेही वाचलंत का?

Back to top button