Macallan Adami 1926 : जगातील सर्वात महागड्या, ९६ वर्षे जुन्या व्हिस्कीचा होणार लिलाव; ‘इतकी’ असेल किंमत | पुढारी

Macallan Adami 1926 : जगातील सर्वात महागड्या, ९६ वर्षे जुन्या व्हिस्कीचा होणार लिलाव; 'इतकी' असेल किंमत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॅकलम अदामी ही जगातील सर्वांत महागडी स्कॉट व्हिस्की मानली जाते. या ९६ वर्ष जुन्या सिंगल माल्ट व्हिस्कीच्या दुसऱ्या बॉटलवर नोव्हेंबर २०२३ मध्ये हातोडा पडणार आहे. याबाबतची माहिती सोथबी या लिलावगृहाने दिली आहे. ही व्हिस्की 1.2 दशलक्ष पौंड (अंदाजे 12 कोटी INR) पर्यंत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मॅकलन १९२६ ही अशी व्हिस्की आहे, जी प्रत्येक लिलावकर्त्याला विकायची आहे,असे सोथबीचे जागतिक प्रमुख जॉनी फॉउल म्हणाले आहेत.

बीबीसीच्या मतानुसार, सोथबीने द मॅकलन १९२६ या व्हिस्कीचा उल्लेख ‘पवित्र ग्रेल’ असा केला होता. स्पिरीटची ​​दुर्मिळता हा त्याच्या किमतीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. अधिकृत वेबसाइटनुसार, द मॅकनलच्या ४० बॉटल सहा दशके जुन्या होण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या ४० बॉटल जुन्या मॅकलन १९२६ चे vintage version आहेत. या ४० बॉटल्सपैकी केवळ एक बॉटल उघडण्यात आली असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button