IT Company Hiring: खुशखबर! यूएसमधील ‘ही’ IT कंपनी देणार १००० हून अधिक भारतीयांना नोकरी | पुढारी

IT Company Hiring: खुशखबर! यूएसमधील 'ही' IT कंपनी देणार १००० हून अधिक भारतीयांना नोकरी

पुढारी ऑनलाईन: अमरिकेतील मंदीमुळे अनेक IT कंपन्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. या अशा निराशाजनक वातावरणातच अमेरिकेतील एका कंपनीने नोकरभरतीची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेच्या माध्यमातून कंपनीने तब्बल १००० IT प्रोफेशन्सना नोकरीची संधी (IT Company Hiring) देणार असल्याचे अमेरिकेतील Axtria या आयटी कंपनीने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतील अ‍ॅक्स्ट्रिया ही आयटी कंपनी life sciences industry मध्ये प्रामुख्याने काम करते. या कंपनीने रविवारी (दि.१९ जून) पुढील आठ महिन्यात आम्ही डेटा सायन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा इंजनिअरिंगमध्ये तब्बल १ हजारांहून अधिक लोकांना नोकरी देणार (IT Company Hiring)  असल्याचे जारी केलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट केले आहे.

IT Company Hiring: डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स या पदांची भरती

अमेरिकन कंपनी अ‍ॅक्स्ट्रिया ही केवळ भारतातील गुरुग्राम, बेंगळुरू, नोएडा या शहरांमध्येच नाही, तर हैद्राबाद आणि पुणे या आयटी शहरांमध्ये देखील कंपनीची कार्यालये उभारण्याचा विचार करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच Axtria ही कंपनी आपल्या भारतातील कार्यालयात पुढील ८ ते १० महिन्यांत देशातील १००० हून अधिक डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि डेटा इंजनिअर्स ही पदे (IT Company Hiring) भरणार असल्याचेही कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विद्यालयातील प्लेसमेंट सेलशी संवाद सुरू

सध्या Axtria कंपनीच्या कार्यालयांमध्ये ३ हजारांहून अधिक भारतीय नोकरी करत आहेत. दरम्यान पुढील दोन वर्षात कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भरती करण्याचा कंपनीचा उद्देश असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कर्मचारी भरतीसाठी कंपनी भारतात महत्त्वाच्या IIT, प्रमुख अभियांत्रिकी विद्यालये आणि व्यवस्थापन विद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेलशी संवाद साधत असल्याचे देखील कंपनीकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button