IBM Hiring AI for Job : ‘आयबीएम’मधील 7800 जणांना गमवावी लागणार नोकरी! AI आणणार पोटावर पाय

IBM Hiring AI for Job : ‘आयबीएम’मधील 7800 जणांना गमवावी लागणार नोकरी! AI आणणार पोटावर पाय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IBM Hiring AI for Job : एआय (AI) म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक कंपनी एआयला डोळ्यासमोर ठेवून आपले सॉफ्टवेअर विकसित करत आहे. त्यातच आता इंटरनॅशनल बिझनेस मशिन कॉर्पोरेशन म्हणजेच आयबीएम या कंपनीने एआय बाबत मोठा खुलासा केला आहे. कंपनी येत्या काळात जवळपास 7,800 जागांवर कर्मचाऱ्यांऐवजी एआयची नियुक्ती करणार असल्याचे समोर आले आहे. आयबीएमच्या या घोषणेमुळे अनेकांवर नोकरी जाण्याची वेळ आली आहे.

आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा (Arvind Krishna) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कंपनी येत्या काही वर्षांत नोकरभरती थांबवून त्याजागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणण्याची योजना आखली आहे. कंपनीला वाटते की येत्या काही वर्षांमध्ये कंपनीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे अंदाजे 7,800 नोकऱ्यांमध्ये बदल करता येऊ शकतो.' (IBM Hiring AI for Job)

पुढील 5 वर्षांत 30 टक्के कामगारांची जागा ऑटोमेशन आणि एआयने घेतलेली दिसेल. 30 टक्के कर्मचारी म्हणजेच सुमारे 7800 लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात. ई-ग्राहक सेवेव्यतिरिक्त, एआय टूल कोड तयार करणे आणि मजकूर लिहिणे यासारख्या अनेक गोष्टी करत आहे. पण कोणत्याही कपातीऐवजी एआय वापरण्याची योजना अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही,' असेही कृष्णा म्हणाले. (IBM Hiring AI for Job)

आयबीएम किती लोकांना रोजगार देते?

आयबीएममध्ये सध्या सुमारे 260,000 कर्मचारी कार्यरत आहेत आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी नियुक्त केले जातात. कृष्णा म्हणाले की, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आज टॅलेंट शोधणे सोपे आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती. सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news