Google New AI Chatbot: भारतासह १८० देशात गुगल लॉन्च करणार ‘Google Bard’ हा नवीन AI चॅटबॉट | पुढारी

Google New AI Chatbot: भारतासह १८० देशात गुगल लॉन्च करणार 'Google Bard' हा नवीन AI चॅटबॉट

New AIपुढारी ऑनलाईन: Google चा ‘गुगल बार्ड’ हा नवीन AI (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) चॅटबॉट भारतासह १८० हून अधिक देशांमध्ये लवकरच लॉन्च होणार आहे, असे Google चे सीईओ सुंदर पिचाई (Google New AI Chatbot) यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे OpenAI च्या ChatGPT या AI चॅटबॉटला थेट स्पर्धा निर्माण होणार आहे.

Google Bard (गुगल बार्ड) हे अखेर भारतामध्ये सादर करण्यात आले आहे. यामध्ये इंटरेस्ट असणारे युजर्स Google Bard अधिकृत वेबसाइटद्वारे AI चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकतात. Google I/O 2023 मध्ये गुगलच्या सर्च जायंटने जाहीर केले आहे की, चॅटबॉट भारतासह १८० पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध असणार आहे. Google Bard हे OpenAI च्या ChatGPT चा थेट प्रतिस्पर्धी असणार आहे. मायक्रोसॉफ्टने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या बिंग सर्च इंजिनमध्ये GPT-4 समाविष्ट केल्यानंतर AI या तंत्रज्ञानातील हे (Google New AI Chatbot)  पुढचे पाऊल आहे.

Google ने जाहीर केलेल्या AI च्या माध्यमातून, यूजर्संनी विचारलेल्या प्रश्नांचा प्रतिसाद तयार करेल. सध्या Google चे गुगल बार्ड AI मध्ये अद्याप प्रायोगिक तत्वावर असल्याने मर्यादित यूजर्ससाठी (Google New AI Chatbot) उपलब्ध असणार आहे, असे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button