Benefits of Donating Blood : रक्तदानामुळे हाेताे हृदयविकाराचा धाेका कमी! जाणून घ्या सविस्तर | पुढारी

Benefits of Donating Blood : रक्तदानामुळे हाेताे हृदयविकाराचा धाेका कमी! जाणून घ्या सविस्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. रक्तदान करण्याचे अनेक फायदे आहेत. ठराविक कालावधीनंतर नियमित रक्तदान करणाऱ्यांना दीर्घकालिन शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतात. सध्या हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र काही संशोधनात असे दिसून आले आहे की, नियमित रक्तदानामुळे हृदयरोगाचा धोका कमी (Benefits of Donating Blood) होतो. हृदयरोग असणाऱ्या रूग्णांमध्ये नेमकी काय जोखीम असते आणि रक्तदाने केल्याने हा धोका कसा कमी होतो, जाणून घेऊया याविषयी….

न्यूयॉर्क ‘प्रेस्बिटेरियन‘ या ऑनलाइन मासिकात दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकार असणाऱ्या रूग्णांमध्ये उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंन्शनची जोखीम सर्वाधिक असते. यामध्ये नियमित रक्तदान केल्यास रक्त प्रवाह आणि धमण्यांमधील अडथळा कमी होण्यास मदत होते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम कमी होऊन हृदयविकाराचा धोका टाळता येतो, असे डॉ. रॉबर्ट डीसिमोन यांनी मासिकात (Benefits of Donating Blood) दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप जास्त झाल्यास रक्तातील चिकटपणा वाढतो. यामुळे रक्तांच्या गुठळ्या निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत नियमित रक्तदानामुळे रक्तातील चिकटपणा कमी होण्यास मदत होते, तसेच हृदयविकाराचा धोका देखील टळतो, असे न्यूयॉर्कमधील प्रेस्बिटेरियन/वेइल कॉर्नेल मेडिकल सेंटरचे संचालक डॉ. रॉबर्ट ए. डिसिमोन यांनी मासिकात यासंबंधी दिलेल्या लेखात नमूद केले आहे.

Benefits of Donating Blood: रक्तदानाचे ‘हे’ देखील आहेत फायदे

  • ठराविक दिवसांनी नियमित रक्तदान केल्याने वजन कमी होण्यास आणि निरोगी प्रौढांमध्ये फिटनेस सुधारण्यास मदत होते.
  • रक्तदान केल्याने हेमोक्रोमॅटोसिस या विकाराची जोखीम कमी होऊ शकते किंवा हा विकाराला रोखू शकते. हेमोक्रोमॅटोसिस म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये शरीरात लोहाचे जास्त प्रमाणात शोषण होते.
  • शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असणे म्हणजे कर्करोगाला आमंत्रण आहे. नियमित रक्तदान करून, तुम्ही शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.
  • रक्तदानामुळे नवीन रक्तपेशींच्या निर्मितीला चालना मिळते. रक्तदान केल्यानंतर शरीरातील पेशी ४८ तासांमध्ये पुन्हा कार्यान्वित होतात.
हेही वाचा :

 

Back to top button