World Blood Donor Day : जाणून घ्या; काय आहेत रक्तदान करण्याचे फायदे

World Blood Donor Day
World Blood Donor Day

पुढारी ऑनलाईन डेस्क : रक्तदान करण्यास प्रेरणा देण्यासाठी आणि नियमित रक्तदात्यांचे आभार मानण्यासाठी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. ए, बी, ओ या रक्तगटांचा शोध लावणारे, नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टीनर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत २००४ पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी १४ जूनला हा दिवस जगभरात जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) साजरा होतो.

रक्तदानाबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात नेहमीच भीती असते; पण यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. रक्तदानामुळे केवळ एखाद्याचा जीव वाचवण्यास मदत होत नाही, तर रक्तदात्यासाठी काही आरोग्यदायी फायदेही (World Blood Donor Day) होत असतात. चला जाणून घेऊया रक्तदानाचे काय आहेत फायदे…

World Blood Donor Day: रक्तदानाचे फायदे

१) वजन नियंत्रित ठेवते

ठराविक दिवसांनी नियमित रक्तदान केल्याने वजन कमी होण्यास आणि निरोगी प्रौढांमध्ये फिटनेस सुधारण्यास मदत होते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमहाला हे फायदेशीर ठरू शकते. मात्र रक्तदान करण्यापूर्वी, आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

२) हेमोक्रोमॅटोसिस विकाराला प्रतिबंधित करते

रक्तदान केल्याने हेमोक्रोमॅटोसिस या विकाराची जोखीम कमी होऊ शकते किंवा हा विकाराला रोखू शकते. हेमोक्रोमॅटोसिस म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये शरीरात लोहाचे जास्त प्रमाणात शोषण होते. नियमित रक्तदान केल्याने लोहाचे शोषणाचे प्रमाण कमी होते. म्हणूनच रक्तदान हे हेमोक्रोमाटोसिस असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे.

३) हृदयरोगाचा धोका कमी होतो

नियमित रक्तदानामुळे शरीरीतील लोहाची पातळी नियंत्रित राहते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शरीरात मोठ्या प्रमाणात लोह तयार होण्यामुळे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होऊ शकते जे वृद्धत्व वाढवणे, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकसाठी कारणीभूत ठरते.

४) कर्करोगाचा धोका कमी होतो

शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असणे म्हणजे कर्करोगाला आमंत्रण आहे. नियमित रक्तदान करून, तुम्ही शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हाला कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

५) नवीन रक्तपेशींची निर्मिती होते

रक्तदानामुळे नवीन रक्तपेशींच्या निर्मितीला चालना मिळते. रक्तदान केल्यानंतर शरीरातील पेशी ४८ तासांमध्ये पुन्हा कार्यान्वित होतात. पुन्हा नव्याने रक्तपेशी तयार होतात. रक्तदानात गमावलेल्या सर्व लाल रक्तपेशी ३० ते ६0 दिवसांच्या कालावधीत बदलल्या जातात. त्यामुळे रक्तदान केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news