Bomb Blast : पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट १ ठार, ३ जखमी | पुढारी

Bomb Blast : पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट १ ठार, ३ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेशावरमध्ये मोटारसायकलमध्ये पेरलेल्या बॉम्बच्या स्फोटात किमान एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे.  प्रांतीय राजधानीत बुधवारी (दि.१७) मोटारसायकलची दुरुस्ती सुरू असताना हा स्फोट झाला. पेशावर हे पाकिस्तानमधील सहावे मोठे शहर आणि खैबर पख्तूनख्वाची राजधानी आहे. (Bomb Blast)

Bomb Blast : १ ठार, ३ जखमी

माहितीनूसार, पेशावर शहरातील रिंग रोडवरील एका हॉटेलजवळ ही घटना घडली.”मोटारसायकलमध्ये पेरलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हा स्फोट झाला. आम्ही स्फोटाच्या स्वरूपाची माहिती गोळा करत आहोत. प्राथमिक अहवालानुसार मोटारसायकल दुरुस्त करत असताना हा स्फोट झाला,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जखमींमध्ये मोटरसायकल मालकाचा समावेश असून जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

बॉम्ब निकामी करणार्‍या पथकाने दिलेल्या निवेदनानुसार २०० ग्रॅम इंप्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) स्फोटात वापरण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कौटुंबिक-संबंधित घटनांमध्ये वारंवार आयईडीचा वापर केला जातो. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button